कोणत्या प्रकारचा चित्रपट मराठीत निर्माण करणे व्यावसायिकदृष्टय़ा गरजेचे असते? महिलांच्या प्रश्नावरील चित्रपट पाहायला महिला प्रेक्षकांची हमखास गर्दी होते, म्हणून तसे काही विषय हाताळणे अगदी योग्य.
हवं तर दिग्दर्शिका कांचन अधिकारी हिला विचारा. ‘मानिनी’सारखा महिला प्रेक्षकांना आवडणारा विषय हाताळूनही ती विनोदीपटांकडे वळली. पण त्यात विशेष गंमत आली नाही. ‘मोकळा श्वास’ साकारताना मात्र तिने त्या हुकमी महिला प्रेक्षकांचाच विचार केला व अत्यंत भावपूर्ण कथानक साकारले. मराठीत ‘काही तरी वेगळे करा हो’ असे म्हणणाऱ्यांनी या वस्तुस्थितीचाही विचार करावा.. सगळी गणिते यशाशी निगडित असतात.

Story img Loader