हल्ली हे फारच होऊ लागलंय हो..
विशेषत: तारकांच्या बाबतीत, एकीला भूमिका अथवा अगदी आयटेम गीत ऐकवायचे, त्यासाठी तीच कशी योग्य आहे हे व्यवस्थित पटवायचे (असा अहंकार करवल्याने ‘मानधनाचा आकडा’ घसरू शकतो अशी अपेक्षा.) पण थोडय़ा दिवसांनी पाहायचे तर काय? त्या निर्माता-दिग्दर्शकांनी दुसऱ्याच कोणाला तरी घेऊन चित्रीकरण पूर्ण केले.. सिया पाटीलबद्दल हेच झाले, पण ती फक्त चिडचिड व्यक्त करीत बसले नाही, तिने काहीजणांना – असले प्रकार फार वाढलेत, तेव्हा सांभाळा, असे सांगायला सुरुवात केली. भरत जाधवच्या एका चित्रपटात तिच्याऐवजी तेजा देवकरवर आयटेम गीत चित्रित झाले हे सियाला सहनच कसे होईल?    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा