चुलबुल पांडे च्या यशस्वी व्यक्तीरेखेने सलमान खान याला ‘दबंग’ ने चांगला हता दिला. हिट चित्रपटांच्या मालिकेतील दबंग चा पुढील भाग दबंग-२ शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. मुळातच आदमी सोचता कुछ और है, मगर होता कुछ है.. हिंदी सिनेमातील हा हुकमी संवाद कधी कधी हिंदी चित्रपटातलाच लागू पडतो,
‘दबंग’चा ‘दबंग २’ पर्यंतचा प्रवास तोच ‘खेळ’ दाखवतो.
अभिनय कश्यपच्या ‘दबंग’च्या पटकथेत फारशी कोणाला ‘जान’ दिसत नव्हती. चार-पाच निर्माता-दिग्दर्शकांनी ‘नकारघंटा’ दाखवताना ‘दबंग’ या नावावरच शंका व्यक्त केली. अखेर पटकथाकाराच्या पुत्रालाच (सलिम खानचा मुलगा अरबाझ) ‘त्यात काहीतरी मसालेदार दिसले’ नि अभिनय कश्यप दिग्दर्शक म्हणूनही उभा राहिला. (म्हणे दिग्दर्शक जन्मावा लागतो.)
..पुढची यशोगाथा तुम्हाला माहीतच आहे.  मगर पिक्चर अभी बाकी है दोस्त.. ‘दबंग २’च्या दिग्दर्शनासाठी अभिनय कश्यपने नकार देताच अरबाझ खानने दिग्दर्शक म्हणून सूत्रे हाती घेतली. (तरी म्हणे, दिग्दर्शक..) यावेळी ‘दबंग’चा ‘पुढचा भाग’ निर्माण करण्याचे ठरले आणि पात्ररचना, पटकथा, संवाद या साऱ्याची आखणी झाली.
‘चुलबूल पांडे’ या घडामोडीत ‘मागील चित्रपटातून पुढील चित्रपटा’त पुढे कायम राहिलाय. सलमान खान व सोनाक्षी सिन्हा हा ‘जोडा’ कायम असल्याने आपण ‘दबंग’चा पुढचा भाग पाहतोय याच्याशी प्रेक्षक लवकर जोडले जातील, असा विश्वासच चित्रपटाचे यश सुरक्षित करते का हो?  सलमान खानला तरी तसे वाटते. मेहबूब स्टुडिओत त्याच्या भेटीचा योग आला असताना त्याचा एकूणच विश्वास याचभोवती व्यक्त होत राहिला. काही काही कलाकार पुरते एखाद्या भूमिकेत शिरतात, चित्रपटमय होतात याचा यापेक्षा ‘जबरदस्त’ पुरावा तो काय हवा..             

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा