पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर द्रमुकमधून निलंबित करण्यात आलेले खासदार एम़ के. अळ्ळगिरी यांनी गुरु वारी पंतप्रधान डॉ़ मनमोहन सिंग यांची भेट घेतली़ द्रमुकचे सर्वेसर्वा करुणानिधी यांच्या पुत्राची ही खेळी म्हणजे ऐन निवडणुकीच्या तोंडावर द्रमुकला शह देण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आह़े अळ्ळगिरी यांच्याकडून नवीन पक्षस्थापनेची शक्यता व्यक्त करण्यात येत असतानाच त्यांनी मात्र या संदर्भात समर्थकांचा विचार घेतल्यानंतरच निर्णय घेणार असल्याचे सांगितल़े
यूपीए सरकारमधून बाहेर पडण्याच्या निर्णयाबाबत अळ्ळगिरी यांनी खेद व्यक्त केला़ तसेच माझी पुढील भूमिका जाणून घेण्यासाठी दोन महिने धीर धरा़ मी कार्यकर्त्यांशी चर्चा करून या संदर्भात निर्णय घेईन, असे अळ्ळगिरी यांनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर सांगितल़े पंतप्रधानांची केवळ सदिच्छा भेट घेतल्याचेही सांगायला ते विसरले नाहीत़ येत्या निवडणुकांमध्ये मी माझी भूमिका बजावेन; परंतु ही भूमिका कोणत्या प्रकारची असेल हे मात्र मी सांगू शकत नाही, असेही ते म्हणाल़े मंत्रिमंडळात २००९ ते २०१३ या काळात काम करता आले याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानल्याचेही अळ्ळगिरी यांनी या वेळी सांगितल़े
अळ्ळगिरी-पंतप्रधानांच्या भेटीने द्रमुकमध्ये अस्वस्थता
पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर द्रमुकमधून निलंबित करण्यात आलेले खासदार एम़ के. अळ्ळगिरी यांनी गुरु वारी पंतप्रधान
First published on: 14-03-2014 at 12:11 IST
TOPICSलोकसभाLoksabhaलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionलोकसभा पोल २०२४Lok Sabha Pollsसंसदीय निवडणुकाParliament Election
Web Title: Denied dmk ticket for ls polls alagiri meets manmohan singh