हर्विंग लोझानोनं रशियातल्या ल्युझिन्की स्टेडियवर गोल झळकावला खरा पण, त्याचे पडसाद थेट मेक्सिकोत पाहायला मिळाले. विश्वचषकात जर्मनीविरुद्ध सामन्यात लोझानोनं गोल केल्यानं अवघ्या मेक्सिकोत चाहत्यांनी एकच जल्लोष केला. जणू मेक्सिकोला भूकंपाचे धक्केच जाणवत असावे अशी स्थिती निर्माण झाली होती. प्रत्येकजण लोझानोचा तो गोल आनंदाने साजरा करत होते. २०१८ च्या विश्वचषकातील मेक्सिकोने गतविजेत्या जर्मनीचा केलेला पराभव अनेक गोष्टी सांगून जातो, या सामन्यामुळे दिग्गज संघांसाठी ही स्पर्धा आता सोपी जाणार नाही ही बाब देखील पुन्हा एकदा अधोरेखित झालेली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
फिफा विश्वचषकात मेक्सिकोनं जर्मनीवर मिळवलेला हा पहिलाच विजय ठरला. तर मेक्सिकोनं १९८५ नंतर जर्मनीवर पहिल्यांदाच विजय मिळवला. इतकच नाही तर एकसंध जर्मनीला प्रथमच फिफा विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं. १९९० साली पूर्व आणि पश्चिम जर्मनी एकत्र आले होते. त्यानंतर जर्मनीनं प्रत्येक विश्वचषकात विजयी सलामी दिली होती. मेक्सिकोला या सामन्यात बॉलवर म्हणावं तसं वर्चस्व मिळवता आलं नसलं तरी मिळालेल्या प्रत्येक संधीचं ते सोनं करण्याचा प्रयत्न करताना दिसले. अगदी सामन्याच्या पहिल्या मिनिटालाच मेक्सिकोनं जर्मनीवर आक्रमण चढवलं. प्रशिक्षक जोकेम लो यांच्या जर्मनी संघात अनुभव हा ठासून भरलेला आहे. पण मेक्सिको प्रत्येक बाबतीत वरचढ ठरताना दिसला. मात्र गतविजेत्या जर्मनीवर पहिल्याच सामन्यात पराभवाची वेळ का बरं आली असेल, त्यामागे काही प्रमुख कारणं आहेत, ती आज जाणून घेऊयात…..
- जर्मनीचा ढिसाळ बचाव
जेरोमी बोएटेंग, मॅट हमल्स, जोशुआ खिमिच आणि मर्विन प्लॅटेनहार्टसारखे खेळाडू जर्मनीच्या बचावफळीत होते. मेक्सिकोचा काऊंटर अटॅक रोखण्यात जर्मनीच्या खेळाडूंना वारंवार अपयश येत होतं किंवा त्यांना मेक्सिको इतक्या वेगानं आक्रमण चढवेल याची जर्मनीच्या बचावपटूंना जाणीवही झाली नसावी. याचाच फायदा हर्विंग लोझानोनं ३५ व्या मिनिटाला घेतला, आधी मेसूत ओझिल आणि मग टोनी क्रूसला चकवून लोझानोनं मॅन्यूएल नोया नावाची अभेद्य भिंत भेदण्याचा पराक्रम गाजवून दाखवला.
- जर्मनीचं बोथट आक्रमण
जर्मनीनं कालच्या सामन्यात तब्बल २६ वेळा बॉल जाळ्याच्या दिशेनं भिरकावला, पण त्यात त्यांना एकदाही गोल करण्यात यश आलं नाही. टीमो वर्नर, थॉमस म्युलर, मेसूत ओझिल सारख्या खेळाडूंवर जर्मनीच्या आक्रमणाची धुरा होती, पण यातील एकालाही आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. सामी खिदिरा आणि टोनी क्रूस यांच्यावरही जर्मनीच्या आक्रमणाइतकीच बचाव करण्याचीही जबाबदारी होती. सामी खिदिरा ६० मिनिटं या सामन्यात खेळला, पण त्याला ना बचाव नीट करता आला ना आक्रमण. जर्मनीच्या मधल्या फळीतील खेळाडू हे जणू रस्त्यावर चालतात तसे मैदानात फिरताना दिसले. खिदिरानं या सामन्यात केवळ एकच महत्त्वाचा पास केला, ना त्याला टॅकल करता आलं ना चेंडू जाळ्याच्या दिशेनं भिरकावता आला. वर्नर वगळता जर्मनीच्या याच आक्रमक खेळाडूंनी २०१४ चा विश्वचषक गाजवला होता. विशेष म्हणजे गेल्या चार विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात मिळून जर्मनीनं तब्बल २० गोल करण्याचा पराक्रम गाजवला आहे. २००२ साली सौदी अरेबिया विरुद्ध ८ गोल, २००६ साली कोस्टा रिकाविरुद्ध ४ गोल, २०१० साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ गोल आणि २०१४ साली पोर्तुगालविरुद्ध ४ गोल जर्मनीनं ठोकले आहेत. पण यंदा जर्मन खेळाडूंमध्ये तसं आक्रमण करण्याचे गुण कुठेही दिसले नाही.
- गिलेर्मो ओचुआ – दी ग्रेट वॉल ऑफ मेक्सिको
मेक्सिकोच्या विजयात आणखी एका खेळाडूनं मोलाचा वाटा उचलला तो म्हणजे गोलकीपर गिलेर्मो ओचुआ. या सामन्यात ३९ व्या मिनिटाला जर्मनीला गोल करण्याची संधी चालून आली होती. पण गिलेर्मो ओचुआनं टोनी क्रूसची फ्री किक अतिशय शिताफीनं थोपवून लावली. या सामन्यात ओचुआनं जर्मनीचे एकूण आठ फटके रोखले. ३२ वर्षीय ओचुआची ही कामगिरी मेक्सिकोसाठी काही नवी नाही. २०१४ च्या विश्वचषकातही ओचुआनं ब्राझिलविरुद्ध सामन्यात सहा गोल वाचवले होते.
सलग तिसऱ्या विश्वचषकात गतविजेत्या संघाला पहिल्या सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. २०१० साली गतविजेत्या इटलीला पॅराग्वेनं बरोबरीत रोखलं होतं. तर २०१४ च्या विश्वचषकात स्पेनला नेदरलँड्सनं ५-१ अशी धूळ चारली होती. विशेष म्हणजे इटली आणि नेदरलँड्सचं आव्हान त्यावेळी साखळीतच संपुष्टात आलं होतं. आता यंदा गतविजेत्या जर्मनीवर ती वेळ आली नाही म्हणजे मिळवलं.
- विजय शिंदे
आपल्या प्रतिक्रीया vijay.majha@gmail.com या ईमेल आयडीवर कळवा.