|| छाया दातार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबईच्या देवनार भागातील कचऱ्याचा डोंगर अनेक सर्वहारा कुटुंबांना आधार वाटतो.. त्या माणसांच्या कथांसोबत माहितीचे भानही देणारे हे पुस्तक !

आपला चंगळवाद किती फोफावला आहे हे मोजायचे असेल तर मुंबईमधील देवनार येथे यावे आणि एका १८ मजली उंच डोंगरावर नजर टाकावी. १२५ वर्षांपूर्वी सुरू झालेली ही ४०० एकरांची सपाट जागा आज या डोंगराने व्यापली आहे. हा आहे कचऱ्याचा डोंगर. याचे काय करायचे हे अजूनही मुंबई महानगरपालिकेला नक्की उमगलेले नाही. अनेक विचार, संकल्पना आणि निविदा काढल्या गेल्या, अनेक न्यायाधीशांनी महानगरपालिकेवर त्यानिमित्ताने शाब्दिक वार केले, समज दिली..  तरीही हा डोंगर आहे तेथेच उभा आहे, निदान आजपर्यंत. या डोंगराच्या आजूबाजूला मधमवर्गीयांची वस्ती. त्यांना येथून निघणाऱ्या वासाचा, कधी कधी लागणाऱ्या आगींचा आणि त्यातून निघणाऱ्या धुरांचा भयंकर त्रास होतो. येथील लोकांच्या आरोग्यविषयक तक्रारीही वाढत आहेत त्यामुळे त्यांचे निषेध सतत चालू असतात. त्याच वेळी या डोंगराच्या कुशीत जन्माला आलेली एक वस्ती असते. लाखभर लोक या डोंगराच्या आश्रयाने राहात आहेत. तेथील लोकांची या डोंगरामुळे भूक भागत असते. त्यातूनच जन्माला आलेली विजिग, उद्योगधंदे, कौटुंबिक आणि सामूहिक जीवन याचा वेध घेणारे हे पुस्तक, काहीसे कादंबरीसारखे वाटणारे, पण सतत या कचऱ्याच्या ढिगाची आठवण करून देणारे आणि म्हणूनच मनाला टोचत राहणारे. कचऱ्याच्या डोंगराच्या आश्रयाने राहणारी ही माणसे हीही कचऱ्याच्याच मोलाची असतील असे समजणारे मुंबईकर, पण ही त्यांच्यातील माणुसकीचे भान पाहून- या पुस्तकात वाचून- चकित व्हायला होते.

अर्थात असे डोंगर केवळ मुंबईतच नाहीत. जगातील अनेक मोठय़ा महाकाय शहरामध्येही आहेत. मला आठवते मी वाचलेले, ‘स्मोकी माउंटन’ हे पुस्तक, फिलिपाइन्समधील मनिला शहराच्या कचरा गोळा करणारा डोंगर आणि त्याच्यावर राहणारी माणसे, त्यातील काही क्रांतिकारी, शासनापासून लपून राहण्यासाठी योग्य जागा. हे पुस्तक वाचल्यानंतर गूगलवर जाऊन पाहिले तर किमान १० पुस्तके मला ’ट्रॅश’बद्दल पाहायला मिळाली, केवळ माहितीपूर्ण नाही तर तेथे राहणाऱ्या माणसाबद्दल. मुंबईमध्ये स्त्री मुक्ती संघटना आणि पुण्यात कागद, काच, पत्रा संघटना या दोन्ही प्रसिद्ध आहेत. या रस्त्यावर कचरा गोळा करणा-या मुख्यत: स्त्रियांच्या संघटना आहेत आणि त्यांनी या स्त्रियांचे जीवन उंचावण्यासाठी बरेच प्रयत्न केलेले आहेत. पण येथे मी ज्या पुस्तकाचा संदर्भ देते आहे त्यामध्ये वर्णन केलेली मंडळी ही मला वाटते त्यांच्याहून एक पायरी खाली आहेत.

सौम्या रॉय या पत्रकार महिलेने लिहिलेले हे पुस्तक. सौम्याचे गेली २० वर्षे एका छोटय़ा स्वयंसेवी संस्थेतर्फे या डोंगरावरील लोकांना प्रामुख्याने कर्जवाटप करण्याच्या निमित्ताने जाणे-येणे सुरू झाले आणि येथील कचरावेचक कुटुंबांच्या घरात जाण्याची तिला संधी मिळाली. घाणीत जन्माला आलेली मुले, माणसे आणि त्यांचे त्या घाणीवरील अवलंबून असलेले आयुष्य याबद्दल हे पुस्तक.  एका अर्थाने ही फर्झानाची कथा आहे. तिचा जन्म तेथेच झाला आणि शाळेची गोडी न लागता या मुलीला या डोंगराची ओढ लागली. उंच, अ‍ॅथलेटिक आणि भीतीचा लवलेश नसलेली ही मुलगी. घाणीच्या राज्यात कसे जगायचे, जिवंत राहण्याची धडपड करायची, तेथील उपयोगी कचरा पळविण्यासाठी आणि आपल्याच बॅगेमध्ये कोंबण्यासाठी कशा प्रकारचे कौशल्य मिळवायचे, तेथील धोकेबाज परिस्थितीला सामना देत बरोबरीच्या बहिणींना कसे संरक्षण द्यायचे याचे कसब मिळविणारे हे एक आकर्षक व्यक्तिमत्त्व. वयाच्या सहाव्या वर्षांपासून १८व्या वर्षांपर्यंत एखाद्या खेळपटूसारखी जगलेली ही मुलगी डोंगरावर आलेला कचरा दाबण्यासाठी लावलेल्या बुल्डोझरच्या खाली चिरडली जाते. शरीरातील हाडांचा जवळजवळ चुरा होतो. पण आजूबाजूचे कचरावेचक आणि थोरला भाऊ, जो येथेच कचरा वाहून आणणाऱ्या ट्रकचा चालक म्हणून काम करत असतो त्यांच्यामुळे वेळीच शीव रुग्णालयात नेले जाते आणि वाचते. मात्र त्यानंतर तिचे आवडते कचरा वेचण्याचे काम तिला करणे अवघड जाते. तिचे लग्न तेथीलच एका अनाथ ट्रक ड्रायव्हरशी होते. मूल होते आणि दुसऱ्या मुलाच्या वेळी तिला गर्भ राहिलेला असताना टीबीचा संसर्ग होतो. आणि एका खेळाडूसारखे व्यक्तिमत्त्व असलेल्या या मुलीची हार होताना दिसते. हॉस्पिटलमध्ये वेळेवर जाऊन फुकट मिळणाऱ्या गोळय़ा आणणे नवऱ्याला शक्य होत नाही. आणि अतिशय विकल अवस्थेत एका बाजूने सुजलेला गळा घेऊन, गर्भारपणी जमिनीवर पडून टीव्ही बघणे एवढेच तिच्या नशिबी येते.

एका बाजूने लेखिकेने दोन कुटुंबांची गोष्ट बऱ्याच तपशीलवार सांगितलेली आहे. हैदर अली शेख आणि मोहरम अली सिद्दीक हे दोघेही बिहारमधून आलेले. हैदर  हा कपडय़ांवर जरीचे भरतकाम करण्यामध्ये निष्णात होता. मुंबईत एका छोटय़ा कारखान्यात त्याला काम मिळाले होते. पण काही वर्षांत तो कारखाना बंद पडला. काम मिळेना तेव्हा काही लोकांच्या कथा ऐकून तो येथे राहायला आला. मग त्याने तीन मुले आणि बायको शकीमून हिला आणले. तीही डोंगरावर कामाला लागली. त्यांना येथे आल्यावर सहा मुले झाली. पहिल्या तीन मुलांपैंकी जेहाना लग्न करून निघून गेली. सहावे मूल म्हणजे फर्झाना आणि त्याच्या खालची फर्हा. या फर्झानामध्ये मघाशी वर्णन केलेले जिवंत राहण्याचे स्पिरिट काठोकाठ भरलेले होते आणि म्हणूनच या कादंबरीमध्ये तिच्यावर फोकस आहे. तिचा एक भाऊ तेथील अनेक कचरावेचकांसारखा, या ‘कचरा क्षेपणभूमी’च्या राखणदाराशी हातमिळवणी करून तेथील कायदे मोडून जगणाऱ्या गुंडांच्या टोळीत सामील होतो. दुसरा कचऱ्याच्या ढिगातून वेचलेल्या काही मोल्यवान गोष्टी विकत घेणारा व्यापारी होतो. पुढे त्या गोष्टी मोठय़ा व्यापाऱ्यांना विकल्या जातात. हैदर अली आणि त्याच्या बायकोचे मुलींना शाळेत घालण्याचे प्रयत्न चालूच असतात. निदान कुराण तरी वाचता येऊ दे एवढीच अपेक्षा असते. त्याला यश फारच कमी येते. मोहरम अली हा जरा धाडसी कचरावेचक. तो रात्रीच्या वेळी जाऊन कचरा उलथापालथा करून खजिना मिळवीत असे. पुढे तो व्यापारीही बनला. कर्ज घेऊन छोटय़ा- मोठया गोष्टी विकू लागला. त्याची बायको यास्मिनही मोठी हिकमती. त्यांना पाच मुले झाली. अगदी अलीकडे जेव्हा कचरा जाळून इन्सिनरेशनमार्फत वीज बनविता येईल असा प्रकल्प सुरू करण्याचे ठरू लागले आणि डोंगरावरील कचऱ्याची किंमत जेव्हा मुंबई महानगरपालिकेला जाणवली, तेव्हा या कचरावेचकांना बंदी घालायचा निर्णय झाला आणि अनेकांच्या उत्पन्नांवर गदा आली. मोहरम अलीसारख्या लोकांनी मोठे कर्ज घेऊन ठेवले होते ते फेडणे कठीण झाले आणि तो परागंदा झाला. त्याच्या बायकोला घर चालविणे कठीण झाले. तोवर तिला सरोगसीद्वारे मुले जन्माला घालणाऱ्या हॉस्पिटलचा शोध लागला होता. ती स्वत:चे गर्भाशय भाडय़ाने देऊन मूल जन्माला घालायला तयार झाली होती. एका मैत्रिणीबरोबर ती बडोद्याला गेली. टेस्टिंगसाठी तिला दोनदा पैसेही मिळाले. संसाराला हातभार लागला. तिसऱ्या वेळी मात्र गाडीत चढता चढता अपघात होऊन ती पडली. तिची उत्पन्न मिळविण्याची ही संधी हुकली. सर्वावरच आपत्ती कोसळू लागल्या होत्या.

दुस-या बाजूने डोंगर कसा आणि कधीपासून तयार होत गेला याचीही कथा  अधूनमधून येते, कारण त्या सगळय़ाचा या कचरा वेचकांवरही परिणाम होत असतो, त्यांचे जीवन ढवळून निघत असते. वाचकालाही वास्तवतेचे भान येते. महानगरपालिकेचे दुर्लक्ष, डोळय़ाआड करण्याची प्रवृत्ती, नाकर्तेपणा आणि एकूणच अर्बन प्लॅनिंग या महत्त्वाच्या गोष्टीचा पूर्ण अभाव. लेखिकेने जे काही दस्तऐवज शोधून काढले त्यावरून असे दिसते की १८९६ साली मुंबईच्या प्रशासनातील एका अधिकाऱ्याला फोर्ट भागात पसरलेल्या कचऱ्याचे भान आले आणि जागेच्या शोधात देवनार भागाची निवड झाली.  त्यानंतर कधीही मुंबई बेटावर काहीही रस्त्यांच्या सुधारणा करायच्या झाल्या की तेथील झोपडय़ा तोडून त्या लोकांना देवनारच्या या घाणीच्या जागेकडे – ‘कचरा क्षेपणभूमी’जवळ आणून टाकण्यात आले. लेखिकेला भेटलेली विठाबाई कांबळे ही तिच्या म्हणण्याप्रमाणे सर्वात प्रथम येथे वस्तीला आलेली स्त्री. आणि सुरुवात केल्यापासून जवळजवळ १०० वर्षांनी, १९९८ साली आलेला हैदर अली व त्याचे कुटुंब. तो बंजारा गल्लीमध्ये स्थायिक झाला. बहुतेक मुसलमान मंडळी येथे राहात. त्यांना जागा मिळाली ती सर्वात गैरसोयीची, डोंगराला चंद्रकोरीसारखे वळण जेथे आलेले तेथे. एका बाजूला समुद्राला मिळाणारा नाला. ज्यामध्ये भरतीचे पाणी आले की जवळपासच्या झोपडय़ामध्ये शिरत असे. बराचसा कचराही डोंगराच्या उतारावरून नाल्यामध्ये पडत असे. पण त्याच घाणेरडय़ा पाण्यात फर्झानासारख्या पोरांना पोहायलाही आवडत असे. अशा या डोंगराच्या अस्ताबद्दलचा विचार सुरू झाला तो २०१६ साली मोठी आग लागून आसपासच्या मध्यमवर्गीय वस्तीला त्रास झाला तेव्हा. तशा तर छोटय़ा मोठय़ा आगी सतत लागत असत. दबलेल्या कचऱ्याखाली कंबशन होऊन मिथेन तयार होत असतो आणि सहज आग लागू शकते. त्याआधीही महानगरपालिकेने या कचऱ्याचे काय करता येईल याबद्दल अहवाल तयार केले होते, पण अखेर प्रकरण उच्च न्यायालयात गेले. न्या अभय ओक (हे आता सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती) यांच्या धाकाखाली शेवटी निर्णय झाला २०१९ साली. फॉक्सॉन कंपनी जिने चीनमध्ये असे इन्सिनरेशनचे प्लॅन्ट बसविले होते तिला बोलावून पाच वर्षेपर्यंत तिने ते प्लॅन्ट चालवावेत, असे ठरले. पण लगेच २०२० चा लॉकडाऊन सुरू झाला आणि चीन व भारत यांच्यामध्ये लडाख येथे युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे २०२० मध्ये हा बेत रद्द करण्यात आला.

लेखिकेने येथील सांस्कृतिक वातावरणही चांगले रंगविले आहे. मुख्यत: तिच्याकडे येणारी ही मुस्लीम मंडळी एका अर्थाने हताश, तब्येतीमुळे तसेच अंधश्रद्धेमुळे.  तरीही त्यांचा सण साजरे करण्याचा उत्साह, त्यासाठी काडीकाडी विकून पैसे मिळविण्याची पराकाष्ठा. कचरा घेऊन येणाऱ्या ट्रकमधील कचरा आपल्यालाच पहिला आधी मिळावा म्हणून चाललेली हमरीतुमरी, ट्रकच्या पुढे पळत जाऊन ट्रक अंगावर पडण्याचा धोका, किंवा त्या कचऱ्यामध्ये गाडले जाण्याची भीती. रात्रीच्या वेळी डोंगराच्या माथ्यावरून दिसणारा चंद्र पाहण्यातील आनंद. त्याच वेळी आजारपणाच्या कारणांमध्ये दग्र्यातील मौलवीने केलेले शैतानाचे भाकीत आणि त्याला वारण्यासाठी आठ दिवस दग्र्याला भेट देण्याचा उपाय भक्तिभावाने करण्यातील श्रद्धा. एकमेकांना मदतीसाठी पुढे होण्याची प्रवृत्ती. कर्ज घेण्यासाठी चार चारचा गट करण्याची अट मानून, एखाद्याचा हप्ता चुकला की दुसऱ्या तिघांनी मिळून भरण्याची तयारी. त्यातील फारच थोडे तेथून बाहेर पडून दुसरे काही उद्योग करू शकत होते. हैदर अलीही एकदा गावी जाऊन परतला. पण डोंगराच्या आश्रयाशिवाय त्याला राहता येईल अशी परिस्थिती कधीच तयार होत नव्हती.

या पुस्तकाला तज्ज्ञांचा, जाणकारांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तेच वाचनीय आहेच. याचबरोबर आणखी एक विचारही मनात येतो की श्रीमंतांच्या मोटरगाडय़ांना भरधाव वेगाने दक्षिण मुंबईकडे जाता यावे म्हणून समुद्राच्या कडेने जाणारा कोस्टल रोड बांधण्यापेक्षा आपल्या पर्यावरण खात्याने हा कचऱ्याचा डोंगर कायमस्वरूपात नष्ट कसा होईल यासाठी यंत्रणा बसविण्यासाठी लक्ष दिले असते आणि पैसे तेथे खर्च केले असते तर पर्यावरण खात्याचे आणि मंत्र्याचे नाव अधिक उज्ज्वल झाले असते का?

chhaya. datar1944 @gmail. com