मिथुन : अनुकूल वातावरण

पराक्रम स्थानातून अमावास्या सिंह राशीत होत आहे. शुक्र तूळ राशीत पंचम स्थानात, मंगळ कन्या राशीत चतुर्थस्थानात ५ सप्टेंबर रोजी प्रवेश करेल. गणेश चतुर्थी दिवशी गणरायाला मनोकामना पुरी होण्यासाठी संकल्प कराल. बघितलेले आगामी स्वप्न लवकरच पूर्ण होणारे आहे. धाडसी व पराक्रमी नेतृत्व राहील. इतरांच्या सांगण्यावरून कोणतीही गोष्ट करणे तुम्हाला आवडणार नाही. स्वत:च्या कार्यकौशल्याचा चांगलाच उपयोग करून घ्याल.

नोकरदार वर्गाला नवे काही शिकण्याचा हुरूप वाढेल. व्यापारी वर्गाला फायद्याच्या दृष्टीने वेगवेगळे आडाखे बांधता येतील. त्यातूनच फायद्याचे प्रमाण वाढलेले असेल. राजकीय क्षेत्रात रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. मुलांच्या आवडीनिवडीकडे लक्ष द्याल. घरगुती वातावरण अनुकूल असेल. आरोग्य ठणठणीत असेल.

शुभ दिनांक : १०, ११

महिलांसाठी : चांगले विचार आत्मसात कराल.

स्मिता अतुल गायकवाड

Story img Loader