श्रीकांत कुवळेकर

जगात सर्वत्र माजलेला महागाईचा आगडोंब विझवण्यासाठी या व्याजदर वाढीचे सत्र चालू झालेले आहे. या महागाईचा आणि कमोडिटी मार्केटचा काही संबंध आहे काय आणि गुंतवणूकदारांसाठी त्यातून कोणत्या संधी उपलब्ध झाल्या आहेत?

Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Surya-Shukra Yuti 2025
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; सूर्य-शुक्राची युती नव्या वर्षात करणार मालामाल
Income Tax , salary , Finance Minister,
पगारदारांच्या ‘इन्कम टॅक्स’मध्ये कपात? क्रयशक्तीत वाढीसाठी अर्थमंत्र्यांकडून उपाय शक्य
A photo representing gold investment.
Gold Investment : सोने गुंतवणूकदारांची चांदी, २०२४ मध्ये मिळवला २७ टक्के परतावा; भविष्यातही सोने चकाकणार
Surya Nakshatra Gochar 2024
२९ डिसेंबरपासून मिळणार छप्परफाड पैसा! सूर्यदेवाच्या कृपेने चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब
Honda Nissan merger
होंडा, निस्सानचे ऐतिहासिक महाविलीनीकरण; ऑगस्ट २०२६ पर्यंत तडीस नेण्याचा निर्धार
gold prices
लग्नाच्या हंगामात सोन्याच्या दरात मोठे बदल… ग्राहकांची चिंता…

अमेरिकेची मध्यवर्ती बँक – फेडरल रिझव्‍‌र्हने महागाईला काबूत आणण्यासाठी व्याजदर मोठय़ा प्रमाणात वाढवण्याची आवश्यकता प्रतिपादित करून आता सुमारे सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. त्यानंतर अमेरिकेत व्याजदरात १.५ टक्के वाढही झाली असून या आठवडय़ात (२६-२७ जुलैच्या बैठकीतून) परत एकदा ०.७५ टक्के किंवा पूर्ण १ टक्का वाढ होण्याची शक्यता आहे. जूनमधील ०.७५ टक्के वाढ ही तीन दशकातील सर्वात मोठी वाढ ठरली आहे. अमेरिकेची री आता इतर देशांच्या मध्यवर्ती बँकादेखील ओढू लागल्या आहेत. इंग्लंडनंतर आता युरोपीय संघाची मध्यवर्ती बँक – ‘ईसीबी’ने देखील ११ वर्षांनंतर प्रथमच अर्धा टक्का वाढ करून सर्वाना चकित केले आहे. भारतात रिझव्‍‌र्ह बँकेने दोन दरवाढी यापूर्वीच केल्या असून परत एकदा तिसऱ्या वाढीसाठी ती तयार झाली आहे. जगात सर्वत्र माजलेला महागाईचा आगडोंब विझवण्यासाठी या दरवाढीचे सत्र चालू झालेले आहे. या महागाईचा आणि कमोडिटी मार्केटचा काय संबंध आहे आणि गुंतवणूकदारांसाठी त्यातून कोणत्या संधी उपलब्ध झाल्या आहेत याची माहिती घेण्याचा प्रयत्न करूया.

वर म्हटल्याप्रमाणे अमेरिकेने व्याजदर वाढीची आवश्यकता असल्याचे म्हटल्यानंतर अमेरिकी डॉलर वेगाने वाढू लागला. मोठमोठय़ा संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून जगातील सर्व मालमत्तांमधून पैसे काढण्याचे सत्र सुरू झाले आणि हे पैसे डॉलरमध्ये गुंतवणुकीसाठी वळवण्यात आल्याने ‘डॉलर इंडेक्स’ बघता बघता १०० वरून १०८-१०९ म्हणजे नऊ टक्क्यांनी वाढला. याचा परिणाम म्हणून कमोडिटी, शेअर्स आणि इतर देशांच्या चलनांमध्ये जो हलकल्लोळ माजला तो अजूनही शमलेला नाही आणि नजीकच्या काळात शमेल किंवा नाही याबद्दल कोणीच छातीठोकपणे सांगू शकत नाही. या गोष्टीचा आपण केवळ कमोडिटी मार्केटच्या अनुषंगाने अभ्यास करूया. वित्त आणि वस्तू बाजारात मोठी घसरण आल्यामुळे एकीकडे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले असताना बचत खात्यामध्ये पैसे राखून असलेल्या आणि या घसरणीमध्ये संधी शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आता सोने आणि चांदीसारख्या कमोडिटीजकडे लक्ष देणे गरजेचे आहे. दोन वर्षांपूर्वी प्रति औंस २,०७५ डॉलपर्यंत गेलेले सोने आज १,७०० डॉलपर्यंत आले आहे. रुपयाचे अवमूल्यन आणि वाढीव आयात शुल्क जमेस धरले तरी भारतीय मानकाप्रमाणे ५७,५०० रुपये प्रति १० ग्रॅमवरून सोने किरकोळ बाजारात ५२,५०० रुपयांवर आलेले आहे. तर एमसीएक्स या कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे १०० ग्रॅमचे कॉन्ट्रॅक्ट ५०,२०० रुपयांच्या दरम्यान उपलब्ध आहेत. तर करोनाकाळात ७७ हजार रुपये किलोपर्यंत गेलेली चांदीदेखील ५५,००० रुपयांना उपलब्ध आहे.

इतर वस्तूंच्या किमती पडल्या असल्या तरी अजूनही कोविड-पूर्वकालीन किमतींपेक्षा त्या चांगल्याच वर आहेत. जरी सराफा बाजार आकर्षक वाटत असला तरी लगेचच गुंतवणूक करण्याइतपत किमतीमधील तळ अजूनही दिसला आहे असे म्हणता येणार नाही, परंतु टप्प्याटप्प्याने आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी वातावरण तयार होत आहे हे नक्की. सुरुवात २५ टक्के निधी गुंतवून करावी. किमतीमधील तळ गाठणे कोणालाच आजपर्यंत शक्य झाले नसले तरी येत्या काळात घडू शकणाऱ्या मोठय़ा घटना आणि त्यामुळे सोन्यावर होऊ शकणारा परिणाम आपण पाहिल्यास तळ जवळ आला आहे असे म्हणण्यास जागा आहे.

उदाहरणार्थ, या आठवडय़ामध्ये अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्ह पाऊण किंवा एक टक्का व्याजदर वाढवेल ही शक्यता आहे. तसेच जागतिक पातळीवर महागाई कमी झाली असली तरी ती पूर्ववत येण्यास अजून वर्ष तरी निश्चितच लागेल. तसेच अमेरिकन आणि युरोपीय अर्थव्यवस्था एका विशिष्ट मर्यादेपर्यंत मंदावली तर त्याचा मागणीवर विपरीत परिणाम होऊन सोने आणि चांदीच्या किमती अजून एकदा घसरतील. परंतु यावेळेस आपला रुपयादेखील अजून घसरून ८१-८१.५० रुपये प्रति डॉलर होऊ शकेल. त्याशिवाय रशियाने युद्धविराम किंवा आपला आक्रमक पवित्रा मागे घेतल्यासदेखील भू-राजकीय तणाव कमी होईल. या सर्वाचा परिणाम म्हणून सोने भारतीय चलनात वायदे बाजारात ४८,२०० रुपये तर चांदी ५२,००० रुपये या स्तरावर येऊ शकतील, असे टेक्निकल चार्ट पाहणाऱ्या बाजारधुरिणांचे अंदाज आहेत. यावेळी अजून ५० टक्के निधी सोने आणि चांदीमध्ये गुंतवावा. अशी परिस्थिती बाजारात आल्यास त्यावेळी मोठे चढ-उतार होतात. त्यावर बारीक लक्ष ठेवल्यास याहूनही अधिक आकर्षक किंमत पातळी आपल्याला मिळू शकते त्यात उरलेला निधी गुंतवावा. अर्थात गुंतवणूक करताना प्रत्यक्ष आकडय़ांपेक्षा कल पाहणे महत्वाचे ठरेल. बाजारात सध्या असलेल्या परिस्थितीमध्ये मोठा बदल झाल्यास त्या अनुषंगाने आपले निर्णय कमी अधिक प्रमाणात बदलावे लागतात.

साधारणपणे अमेरिकी डॉलर आणि सराफा बाजार विरुद्ध दिशेला चालत असतात, परंतु वाढणारा डॉलर हा आर्थिक वाढीमुळे की भू-राजकीय तणावामुळे, की व्याजदर वाढीमुळे असे अनेक पैलू त्याला असतात. यातील प्रत्येक पैलूला सोन्याची चाल वेगवेगळी असते. म्हणजेच डॉलर वाढीच्या काळात कधी कधी सोनेदेखील वाढताना दिसते. या सर्व गोष्टींचा विचार करून सोने आणि चांदीमधील कल कसा राहील हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे. अन्यथा सोन्यातील गुंतवणुकीसाठी हजारो फॉम्र्युले वापरले जात असतात. तसेच सराफा बाजार बऱ्यापैकी अकार्यक्षम असल्यामुळे गुंतवणुकीसाठी थोडे समजून घेऊन वायदे बाजार वापरणे आर्थिकदृष्टय़ा सुरक्षित, अधिक फायद्याचे आणि पारदर्शक व्यवहाराच्या दृष्टीनेदेखील योग्य ठरते.

सध्या दिवसाचे १५ हून अधिक तास, अगदी मोबाइल फोनवर उपलब्ध आणि रिअल-टाइम पद्धतीने चालणारा सराफा बाजार म्हणजे ‘एमसीएक्स’ होय. त्यावर कसे ट्रेडिंग करावे, डिलिव्हरी घ्यावी की नाही आणि घ्यायची झाल्यास कशी घ्यायची याबाबत सविस्तर यापूर्वीच सांगितले गेले आहे. तसेच वायदे बाजारामध्ये डिलिव्हरी न घेतल्यास तीन टक्के जीएसटी भरण्यापासून दूर राहणे शक्य होते. वरील पद्धतीने गुंतवणुकीसाठी एमसीएक्सवरील सोन्याचे ‘गोल्ड-मिनी’ हे १०० ग्रॅम सोन्याचे कॉन्ट्रॅक्ट उपयुक्त ठरू शकतील. परंतु अगदी १ ग्रॅम, आणि ८ ग्रॅम सोन्याचे कॉन्ट्रॅक्ट तसेच चांदीसाठी १ किलो ‘सिल्व्हर-मायक्रो’ आणि ५ किलोचे ‘सिल्व्हर-मिनी’ काँट्रॅक्टसदेखील उपलब्ध आहेत.

लेखक वस्तू बाजार विश्लेषक

अस्वीकरण : कमॉडिटी बाजार हा मुख्यत: जोखीम व्यवस्थापनासाठी असून वरील लेख या गोष्टीचे महत्त्व आणि त्यातील गणित विशद करून सांगण्यासाठी आहे, लेखाला गुंतवणुकीचा सल्ला मानण्यात येऊ नये.

ksrikant10@gmail.com

Story img Loader