Gold- Silver Price Today : १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ४६,६४० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,७५० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ५९,००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

काय आहे आजचा भाव?

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,६४० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५०,८८० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,६९० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,८९० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,६९० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,८९० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४६,६९० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,८९० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५९० रुपये आहे.

Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
rupee continues to depreciate, US dollar, rupee ,
रुपयाचे मूल्य आणखी खोलात!
A photo representing gold investment.
Gold Investment : सोने गुंतवणूकदारांची चांदी, २०२४ मध्ये मिळवला २७ टक्के परतावा; भविष्यातही सोने चकाकणार
onion prices loksatta news
कांदा स्वस्त; गृहिणींना दिलासा, आठवडाभरात किलोमागे २० ते २५ रुपयांनी घट
Vanvaas Box Office Collection Day 4
नाना पाटेकरांच्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर ‘वनवास’, चार दिवसांची कमाई फक्त ‘इतके’ कोटी
SEBI found Bharat Global Developers Limited guilty of serious fraud
वर्षभरात शेअरचा भाव १६ रुपयांवरून १,७०२ रुपयांवर; कुशंकेतून ‘सेबी’कडून या कंपनीच्या शेअर्सच्या व्यवहारांवर बंदी 

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.

२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.

२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.

१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.

१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.

Story img Loader