सोफिया चौधरीने कोणत्या चित्रपटातून भूमिका साकारली याची नावे सांगता येणे कठीण आहे.
काही हरकत नाही, तिलाही त्याचे काही सुखदु:ख नसावे.
तिने मात्र ‘हंगामा हो गया’ या चित्रफितीमध्ये सौंदर्य व नृत्य यांचे समीकरण मांडण्याचा बरा प्रयत्न केला. सारेगामाच्या वतीने या चित्रफितीच्या झालेल्या प्रकाशन सोहळ्यात ती आपल्या या कर्तृत्वापेक्षा वाढत्या नामवंत पाहुण्यांमुळे विशेष सुखावलेली वाटली.. प्रीती झिंटा येणार होतीच, पण सोही अली खान, कुणाल खेमू, तुषार कपूर असे करता करता युवराज सिंगही आला व सोफिया जवळपास ओरडलीच. चित्रफीत निर्मितीपेक्षा प्रकाशन सोहळ्याचा आनंद तिला बहुधा जरा जास्तच झाला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hangama ho gaya movie sophiya actress