महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या २०१२-१३ वर्षांसाठी विद्यापीठ विद्यार्थी परिषदेचे गठण करण्यात आले आहे. अधिसभेसाठी विद्यार्थी प्रतिनिधी तसेच विद्यार्थी परिषदेच्या विविध पदांसाठीची निवडणूक बिनविरोध झाली. अधिसभेवर तीन विद्यार्थी प्रतिनिधी निवडून देण्याची तरतूद आहे. अंतीम मुदतीपर्यंत तीन विद्यार्थी सचिवांचे नामांकन अर्ज प्राप्त झाले. बिनविरोध निवड झालेल्या विद्यार्थी सचिवांमध्ये जळगावच्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या ऋतुराज देशपांडे, अमरावतीतील गुरूदेव आयुर्वेद महाविद्यालयाचा मंगेशकुमार वेरूलर आणि जळगावच्या डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचा निखील पाटील यांचा समावेश आहे.
या निवडीनंतर सदस्यांनी निवडणूक न घेता विद्यार्थी परिषद सदस्यांची नेमणूक केली. त्यात परिषदेच्या अध्यक्षपदी आष्टा येथील अण्णासाहेब डांगे आयुर्वेद महाविद्यालयाचे अरूण पाटील, उपाध्यक्षपदी नागपूरच्या भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालयाचे विपीन आत्राम आणि आंबेगाव येथील सिंहगड कॉलेज ऑफ नर्सिगमधील पिंकल भारनवाल यांची निवड झाली. सचिवपदी पुण्याच्या धोंडीमामा साठे होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयातील मयुरी वालझाडे, सहसचिवपदी धुळ्याच्या के. सी. अजमेरा आयुर्वेदिक महाविद्यालयातील सचिन पाटील आणि पुण्याच्या अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयातील जितेंद्र पंचांगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्रास्तविक व स्वागत विशेष कार्यकारी अधिकारी प्रा. बी. व्ही. कापडणीस यांनी केले.
कुलसचिव डॉ. आदिनाथ सूर्यकर यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार केला.
आरोग्य विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेची निवड बिनविरोध
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या २०१२-१३ वर्षांसाठी विद्यापीठ विद्यार्थी परिषदेचे गठण करण्यात आले आहे. अधिसभेसाठी विद्यार्थी प्रतिनिधी तसेच विद्यार्थी परिषदेच्या विविध पदांसाठीची निवडणूक बिनविरोध झाली. अधिसभेवर तीन विद्यार्थी प्रतिनिधी निवडून देण्याची तरतूद आहे. अंतीम मुदतीपर्यंत तीन विद्यार्थी सचिवांचे नामांकन अर्ज प्राप्त झाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-01-2013 at 12:05 IST
Web Title: Health university student council election unopposed