या आसनाचे नाव बद्धकोनासन ठेवले गेले ते त्याच्या करण्याच्या विशिष्ट पद्धतीवरून. पायाची दोन्ही पावले  जांघेजवळ दुमडली जातात आणि त्यांना हातांनी घट्ट धरून ठेवले जाते, जसे काही त्यांना एका विशिष्ट कोनामध्ये बांधून ठेवले आहे. या आसनाला फुलपाखरासारखे आसन असेही म्हटले जाते.

कृती :

*  पाठीचा कणा ताठ ठेवून आणि दोन्ही पाय समोर सरळ पसरून बसा.

*   आता गुडघे वाकवा आणि तुमच्या जांघेजवळ आणा. तुमच्या पायाचे तळवे एकमेकांना चिकटलेले असले पाहिजे.

*   तुमची पावले हलक्या हातांनी धरा. आधाराकरिता म्हणून तुम्ही तुमचे हात तुमच्या पावलांच्या खाली ठेवू शकता.

*   पायाच्या टाचांना जितके शक्य आहे, तितके जास्त जननेंद्रियांकडे आणा.

*   एक दीर्घ श्वास घ्या. मांडय़ा आणि गुडघ्यांना जमिनीवर खालच्या दिशेने दाबून ठेवा. खाली दाबून ठेवण्याचा हळुवार प्रयत्न करा.

*   आता फुलपाखरू जसे आपले पंख हलवते त्याप्रमाणे पाय वरखाली हलवा. सावकाश सुरुवात करा आणि हळूहळू वेग वाढवत न्या. संपूर्ण वेळ सामान्य श्वासोच्छ्वास सुरू ठेवा.

*  या आसनामुळे मांडय़ांची आतील बाजू, जांघा आणि गुडघ्यांना चांगल्या प्रकारे ताणले जाते.

Story img Loader