फोर्डच्या इकोस्पोर्ट, रेनॉल्ट डस्टर आणि निस्सानच्या टेरॅनोला टक्कर देण्यासाठी ह्युंदाईने ‘क्रेटा’ ही नवी स्पोर्ट युटिलिटी व्हेईकल (एसयूव्ही) बाजारात आणली आहे. या गाडीची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत ८.५९ ते १३.६० या दरम्यान असून, सात रंगांमध्ये ही गाडी ग्राहकांसाठी उपलब्ध झाली आहे. एसयूव्ही श्रेणीच्या गाड्यांना सध्या ग्राहकांकडून चांगली मागणी असल्यानेच ह्युंदाईने क्रेटा बाजारपेठेत उपलब्ध करून दिली आहे. या गाडीला लवकरच मारुती सुझुकीच्या ‘एस-क्रॉस’शी स्पर्धा करावी लागणार आहे. त्याचबरोबर सध्या ग्राहकांच्या पसंतीला उतरलेली फोर्डची इकोस्पोर्ट कार सुद्धा लवकरच नव्या रुपात येणार आहे.
नव्या क्रेटाची काही वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे…
– स्लीक सिल्व्हर, स्टार डस्ट, पर्ल बेज, पोलर व्हाईट, रेड पॅशन, मायस्टिक ब्लू आणि फॅंटम ब्लॅक या सात रंगांमध्ये ही गाडी उपलब्ध
– टॉप एंड मॉडेल व्यतिरिक्त इतस सर्व मॉडेलमधील इंटेरियर काळ्या रंगाचे
– तीन इंजिन्स, दोन ट्रान्समिशन्स हे क्रेटाचे आणखी एक वेगळेपण
– एलईडी इंडिकेटर्स
– क्रोम डोअर हॅंडल्स
– १६ किंवा १७ इंची अलॉय व्हिल्स
– स्लीक टेल लॅम्प्स
– रिअर रूफ स्पॉयलर
– दोन एअरबॅग्जमुळे चालक आणि प्रवाशाच्या सुरक्षेला प्राधान्य, टॉप एंड मॉडेलमध्ये सहा एअरबॅग्ज
– लेन चेंज इंडिकेटर

Story img Loader