गुगल, फेसबुक, अॅपल, एचपी, मायक्रोसॉफ्ट आदी उद्योगांनी जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन संपूर्णपणे बदलला. जगाला नवी दृष्टी देण्याबरोबरच या उद्योगांना जोडणारा आणखी एक समान धागा आहे. हा धागा म्हणजे हे सर्व उद्योग नुकत्याच मिसरूड फुटलेल्या पण डोक्यात भन्नाट कल्पना असलेल्या महाविद्यालयीन तरुणांनी सुरू केले आणि वाढविले. त्यांनी जे केले ते आपण का करू शकत नाही. नेमके हेच सांगण्याचा प्रयत्न इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (आयआयटी) ‘पायोनिअरिंग दि फ्युचर’ या यंदाच्या इ-परिषदेच्या थीममधून होणार आहे.
तरूण पदवीधरांमध्ये उद्यमशीलतेची मूल्ये रूजविण्यासाठी दरवर्षी आयआयटीच्या इ-विभागातर्फे ही परिषद भरविली जाते. यंदा २ आणि ३ फेब्रुवारीला परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. कॉपरेरेट्स, तरूण उद्योजक, गुंतवणूकदार, शिक्षणतज्ज्ञ यांना एकत्र आणून उद्यमशीलतेवर चर्चा घडवून आणणे हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे.
अमेरिकेच्या स्कूल ऑफ स्टार्टअप्सचे जीम बीच, शिकागोचा बॉसीडिएनएचे जो अब्राहम, इस्त्रायलच्या ग्रमीफिकेशनचे रोनेन जाफनी, सिंगापूरच्या डिफरवर्ल्डचे मनोज शर्मा अशा आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची कार्यशाळा यात होईल. तर मॅकेन्सीचे अदील झैनुलभाई, पिन्स्टॉर्मचे महेश मूर्ती, फ्युचर ग्रुपचे देवदत्त पटनाईक, सुपरजॅमचे फ्रेजर दोहर्ती हे चर्चेत सहभागी होतील. या परिषदेत सहभागी होण्यासाठी संपर्क – ecell.in/summit
उद्योगविश्वात येऊ इच्छिणाऱ्या ‘कल्पकां’साठी इ-परिषद
गुगल, फेसबुक, अॅपल, एचपी, मायक्रोसॉफ्ट आदी उद्योगांनी जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन संपूर्णपणे बदलला. जगाला नवी दृष्टी देण्याबरोबरच या उद्योगांना जोडणारा आणखी एक समान धागा आहे. हा धागा म्हणजे हे सर्व उद्योग नुकत्याच मिसरूड फुटलेल्या पण डोक्यात भन्नाट कल्पना असलेल्या महाविद्यालयीन तरुणांनी सुरू केले आणि वाढविले
First published on: 25-01-2013 at 12:02 IST
Web Title: Iit present theme of pioneering the future in e conference