भारताकडे असलेल्या परकीय चलनाची गंगाजळी हळूहळू वाढत असून असे असले तरी जागतिक पातळीवरील अस्थिरतेला हाताळण्यासाठी आणखी ६० अब्ज डॉलर्सचे राखीव परकीय चलन असणे आवश्यक आहे असे एचएसबीसी बँकेने म्हटले आहे.
जागतिक आर्थिक सेवात आघाडीवर असलेल्या एचएसबीसीने म्हटले आहे की, भारताचे परकीय चलन हे पारंपरिक मानकांच्या वर आहे पण देशाती स्थिती व मागील अनुभव लक्षात घेता ६० अब्ज डॉलर इतके परकीय चलन राखीव असणे आवश्यक आहे. कारण जागतिक पातळीवर आर्थिक स्थिती कठीण आहे. आमच्या मते अतिरिक्त ६० अब्ज अमेरिकी डॉलरचा राखीव साठा असणे आवश्यक आहे त्यामुळे एकूण साठा ४२० अमेरिकी डॉलर्स असणे आवश्यक आहे. त्यामुळे आर्थिक अस्थिरतेला तोंड देता येईल. कमी मुदतीची कर्जे, बाह्य़ व्यापारी कर्जे यांची त्यामुळे काळजी घेता येईल.
एचएसबीसीचे भारतातील मुख्य अर्थतज्ज्ञ प्रांजुळ भंडारी यांनी सांगितले की, २०१३ या वर्षांतील काही महिन्यांत भारताने २० अब्ज डॉलर्सचे परकीय चलन गमावले आहे व तेव्हापासून त्यापेक्षा चार पट परकीय चलन साठा ठेवला जात आहे. सध्या हे प्रमाण ३६० दशलक्ष डॉलर्स आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने तीन महिन्यांचे आयातीसाठी लागणारे परकीय चलन राखीव असावे अशी शिफारस केली आहे.
ाारताला ६० अब्ज डॉलर्सच्या अतिरिक्त साठय़ासाठी ३.२ अब्ज डॉलर्स वापरावे लागतील पण त्यामुळे आर्थिक स्थिरता वाढेल. असे असले तरी केवळ परकीय चलन योग्य प्रमाणात आहे म्हणजे आर्थिक सुरक्षितता आली असे म्हणता येत नाही.बहुराष्ट्रीय संघटना, प्रादेशिक व द्विपक्षीय भागीदार हे महत्त्वाचे असतात. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या त्रुटी नियंत्रणात राहतात व चलनवाढीलाही आळा बसतो व आर्थिक वाढ चांगली होते असे एचएसबीसीने म्हटले आहे.
६० अब्ज डॉलर्स भारताकडे हवे
भारताकडे असलेल्या परकीय चलनाची गंगाजळी हळूहळू वाढत असून असे असले तरी जागतिक पातळीवरील अस्थिरतेला हाताळण्यासाठी आणखी ६०
First published on: 27-06-2015 at 08:27 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India need usd 60 billion