देशामध्ये इंधनदरवाढीचा भडका उडालेला असतानाच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती वाढत आहेत. त्यामुळेच आता भारताने सौदी अरेबिया आणि इतर तेल निर्यात करणाऱ्या देशांची संघटना असणाऱ्या ओपेककडून भारताने तेल खरेदी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताला तेल पुरवठा करणाऱ्या या देशांकडून तेलाची आयात कमी करण्याचं भारताने निश्चित केल्याचं वृत्त ब्लुमबर्गने दिलं आहे. ओपेक देशांनी कच्च्या तेलाचं उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतल्याने तेलाचे दर प्रति बॅरल ७० डॉलरपर्यंत पोहचले आङेत. त्यामुळेच आता भारतीय ऑइल रिफायनरीज सौदी आणि ओपेकमधील तेल विक्री करणाऱ्या देशांऐवजी अमेरिकेकडून अधिक तेल विकत घेणार आहे. अमेरिकेकडून मिळणारं तेल हे या देशांपेक्षा कमी दरात उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे सौदी अरेबियाकडे तेलाचे उत्पादन वाढवण्याची मागणी मोदी सरकारने केली होती. मात्र त्यावर सौदीने खोचक शब्दात उत्तर दिल्यानंतर भारताने पर्याय म्हणून अमेरिकेतून तेल आयात वाढवण्याचा निर्णय घेतलाय.
जशास तसं… भारताची विनंती फेटाळणाऱ्या सौदीकडून आयात कमी करणार मोदी सरकार; ‘या’ देशाकडून घेणार तेल
सर्वाधिक तेल आयात करणाऱ्या देशांच्या यादीमध्ये भारत तिसऱ्या स्थानी
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 18-03-2021 at 10:05 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India to cut saudi arabian oil imports and buy more from us scsg