होंडा कंपनी भारतीय बाजारपेठेत लवकरच आपली नवी दुचाकी सादर करण्याच्या तयारीत आहे. पण नुकतेच आता होंडाच्या नव्या स्ट्रीट फायटर बाईकची माहिती समोर आली आहे. ‘Honda Hornet 750’ असे या दुचाकीचे नाव असून गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कंपनीने पहिल्यांदा या दुचाकीचा टीझर रिलीज केला होता. ही दुचाकी पुढील वर्षापर्यंत ऑटोमोबाईल बाजारात दाखल होणार आहे. पण याआधीच या दुचाकीची माहिती लीक झाली आहे.
फीचर्स
Honda Hornet 750 मध्ये १४१९ mm चा व्हीलबेस असेल आणि त्याचे वजन सुमारे १९० किलो असेल. हा व्हीलबेस डुकाटी मॉन्स्टरमध्येही दिसला आहे. त्याच वेळी, त्याचा हँडलबार ७७९cm असेल. दुचाकीमध्ये स्पोर्टिंग हँडलिंग देण्यात आले आहे. कंपनीने दुचाकीमध्ये ७५५cc पॅरलल ट्विन लिक्विड कूल्ड इंजिन जोडले आहे, जे ९०.५ bhp पॉवर आणि ७४.९Nm टॉर्क जनरेट करते. अशी मोटर आगामी ADV, Transalp ७५० मध्ये देखील जोडली गेली आहे.
तसेच बाईकमध्ये ६-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. टीझरनुसार बाईकची रचना खूपच आकर्षक आहे. हे खास तरुणांना लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. हॉर्नेट ७५० मध्ये ABS, TFT, ट्रॅक्शन, इडली, रायडिंग मॉडेल्स आणि रायडर एड्स देण्यात आल्याचा अंदाज आहे.
होंडाची ही नवीन दुचाकी रॉयल एनफिल्ड क्लासिकला टक्कर देईल, अशी माहिती आहे.