गुणतालिकेतील अव्वल दोन संघांमध्ये झालेल्या सामन्यात चेन्नई वरचढ ठरली. फिरकीपटूंनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर चेन्नईने घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्स संघावर एकतर्फी मात केली. चेन्नईचा संघ दिल्लीवर ८० धावांनी मात करत गुणतालिकेत पुन्हा एकदा पहिल्या स्थानावर आला.

सुरेश रैनाचं अर्धशतक आणि त्याला फाफ डु प्लेसिस व मधल्या फळीतल्या फलंदाजांनी दिलेल्या साथीच्या जोरावर चेन्नईने घरच्या मैदानावर १७९ धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून दिल्लीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या षटकांपासून दिल्लीच्या गोलंदाजांनी चेन्नईवर अंकुश ठेवला. शेन वॉटसन भोपळाही न फोडता जगदीश सुचितच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर सुरेश रैना आणि फाफ डु प्लेसिस यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी केली. मात्र या दोन्ही फलंदाजांना आश्वासक गतीने धावा वाढवता आल्या नाहीत. अक्षर पटेलने डु प्लेसिसला माघारी धाडत चेन्नईला दुसरा धक्का दिला. यानंतर सुरेश रैनाची अर्धशतक झळकावून माघारी परतला.

यानंतर महेंद्रसिंह धोनी, अक्षर पटेल यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत संघाला १७९ धावांचा टप्पा गाठून दिला. धोनीने तुफान फटकेबाजी करत २२ चेंडूत ४४ धावा केल्या. यात त्याने ३ षटकार लगावले. यातील एक षटकार धोनीने एका हाताने लगावला. मॉरिसच्या गोलंदाजीवर चेंडू थेट धोनीच्या तोंडावर आला. पण धोनीनेदेखील न बघता एका हाताने चेंडू टोलवला आणि तो थेट षटकार ठरला.

हा पहा व्हिडीओ –

या चेंडूनंतर मॉरिसने त्या प्रकारच्या चेंडूसाठी दिलगिरी व्यक्त केली. तर धोनीनेही मनाचा मोठेपणा दाखवत खिलाडूवृत्ती दाखवली. दिल्लीकडून जगदीश सुचितने २ तर ख्रिस मॉरिस आणि अक्षर पटेल जोडीने प्रत्येकी १-१ फलंदाजाला माघारी धाडलं.

Story img Loader