दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यात ऋषभ पंतने पहिल्या डावात पुन्हा एकदा सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं आहे. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करताना दिल्लीने कोलकात्याच्या आघाडीच्या फलंदाजांना झटपट माघारी धाडलं. यावेळी कोलकात्याचा सलामीचा फलंदाज ख्रिस लिनला माघारी धाडताना ऋषभ पंतने यष्टीमागे अफलातून झेल पकडला.

अवश्य वाचा – Video : जेव्हा कृणाल पांड्या पंजाबच्या फलंदाजाला ‘मंकडिंग’ची हुल देतो

सातव्या षटकात कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर ख्रिस लिन पंतच्या पाठीमागून फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी पंतने वेळ साधून उडी मारत सीमारेषेकडे जाणारा चेंडू पकडला. त्याच्या या कसरतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

दरम्यान आंद्रे रसेल आणि कर्णधार दिनेश कार्तिक यांनी धडाकेबाज अर्धशतक झळकावत संघाला 185 धावांचा पल्ला गाठून दिला. एकवेळ 100 च्या आत बाद होईल अशी परिस्थिती असणारा कोलकात्याचा संघ या दोन्ही फलंदाजांनी केलेल्या भागीदारीमुळे आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत पोहचला. दिनेश कार्तिकने 50 तर रसेलने 62 धावा केल्या. या खेळीदरम्यान रसेलने ऑरेंज कॅपचा मानही पटकावला.

अवश्य वाचा – IPL 2019 : ‘Universal Boss’ गेल समोर सगळे फेल, केली अनोख्या विक्रमाची नोंद

Story img Loader