२०१९ साली होणाऱ्या आयपीएलच्या हंगामाचं बिगुल वाजलं आहे. १८ डिसेंबर रोजी जयपूरमध्ये आयपीएलचा लिलाव रंगणार आहे. यंदा आयपीएलच्या लिलावाचा सोहळा हा आटोपशीर ठेवण्यात आलेला असून केवळ एक दिवस हा लिलाव चालणार आहे. बीसीसीआयने आज याची अधिकृत घोषणा केली आहे. आगामी हंगामामध्ये फक्त ७० खेळाडूंचा लिलाव पार पडला जाईल. यातले ५० खेळाडू हे भारतीय तर २० खेळाडू हे परदेशी असतील. या खेळाडूंच्या खरेदीसाठी आठही संघमालकांकडे सध्या एकत्र मिळून १४५.२५ कोटी इतकी रक्कम शिल्लक आहे. २०१९ साली भारतात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेता, आयपीएलचे सामने देशाबाहेर भरवले जाण्याची दाट शक्यता आहे.

Story img Loader