इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात जसप्रीत बुमराहने आपल्या धारदार गोलंदाजीच्या बळावर अर्धा संघ गारद केला. त्याच्या या कामगिरीमुळे त्याने आयसीसीच्या एकदिवसीय क्रमावारीत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात बुमराहने १९ धावा देऊन ६ बळी घेतले. हा सामना भारताने १० गडी राखून जिंकला होता.
हेही वाचा – IND vs ENG 1st ODI: अर्धा संघ गारद करूनही बुमराहला झाला नाही आनंद! कारण…
याच क्रमावारीत न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट दुसऱ्या क्रमांकावर तर पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. चौथ्या क्रमांकावर जोश हेझलवूड तर अफगाणिस्तानचा मुझीर उर रहमान पाचव्या स्थानावर आहेत.
तर सहाव्या क्रमांकावर बांगलादेशच्या मेहदी हसन आहे. ख्रिस वोक्सला सातव्या क्रमांकावर, तर मॅट हेन्रीला आठव्या क्रमांकावर आहे. अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी नवव्या आणि राशिद खान दहाव्या क्रमांकावर आहेत.
आयसीसीच्या एकदिवसीय गोलंदाजी क्रमवारीमध्ये अफगाणिस्तानचे तीन गोलंदाज पहिल्या १०मध्ये आहेत. भारताचा विचार केला तर जसप्रीत बुमराह हा एकमेव भारतीय गोलंदाज पहिल्या १०मध्ये आहे.
हेही वाचा – IND vs ENG : ड्रेसिंग रूमकडे न जाता दुसरीकडेच वळाली रोहित शर्माची पाऊले!