रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४४व्या वार्षिक महासभेमध्ये (Reliance AGM) रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी अनेक महत्वाचा घोषणा केल्या. दरम्यान मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी यांनी देखील जिओ इन्स्टिट्यूटविषयी एक घोषणा केली आहे. यावर्षीपासून JIO INSTITUTE सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच याची स्थापना नवी मुंबईमध्ये याची स्थापना केली जात असल्याचे नीता अंबानी यांनी सांगितले. एजीएमच्या बैठकीत त्यांनी इतरही अनेक घोषणा केल्या.
यावेळी नीता अंबानी यांनी करोना काळात केलेल्या कामाची माहिती दिली. त्या म्हणाल्या, करोना कालावधीत आम्ही मुलांच्या खेळाशी संबंधित पुढाकार घेतला आहे. आम्ही २.१५ कोटी मुलांपर्यंत पोहोचलो आहोत. देश व समाज मजबूत करण्यासाठी महिला व मुलींना सक्षम बनविणे आवश्यक आहे.
हेही वाचा- 44th Reliance AGM : 5G नेटवर्क सुरू करण्यासंदर्भात ‘रिलायन्स जिओ’ची मोठी घोषणा!
रिलायन्स फाऊंडेशनच्या महत्त्वाच्या ५ मोहिमा
नीता अंबानी म्हणाल्या “व्यवसायासोबत समाजाला सक्षम बनविणे देखील आमचे काम आहे. हे लक्षात घेता रिलायन्स फाऊंडेशने महत्त्वाच्या ५ मोहिमा सुरू केल्या आहेत. यामध्ये पहिली मिशन ऑक्सिजन, दुसरी – मिशन कोविड इन्फ्रा, तिसरी- मिशन अन्न सेवा, चौथी- मिशन कर्मचारी सेवा आणि पाचवी – मिशन लस सुरक्षा,”
“रिलायन्सने आतापर्यंत २ आठवड्यांत, दररोज ११०० मेट्रिक टन ऑक्सिजन तयार केले आहे. रिलायन्स देशातील ११ टक्के वैद्यकीय ऑक्सिजन तयार करीत आहे. तसेच आम्ही दररोज १५,००० करोना चाचणी क्षमता तयार केली आहे. आमचे रिलायन्स कुटुंब आम्हाला प्रेरणा देते आणि हे विशाल कुटुंब आमच्यासाठी प्रेरणास्थान”, असल्याचे निता अंबानी म्हणाल्या.