बोल्ड आणि बिनधास्त चित्रपटांच्या यादीतील जिस्म-२ हा बहुचर्चित चित्रपट आजपासून सर्वत्र प्रदर्शित होत आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी तयार करण्यात आलेल्या पोस्टरवरची पौर्न स्टार सन्नी लिओनाचा चेहरा दाखविण्यापेक्षा तिची फिगर दाखवून प्रेक्षकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न महेश भट्ट यांनी केला आहे. जिस्मच्या पहिल्या भागात हॉट बिपाशाने आपल्या सेक्सी अदाने अनेकांना घायाळ केले होते त्यामुळे पुढील भागात तिचीच वर्णी लागेल असा अनेकांचा अंदाज होता.
पण ऐनवेळी तिच्या जागी सुपरहॉट मल्लिका शेरावतचे नाव पुढे आले. पण ऐनवेळी कोठे माशी शिंकली ते माहित नाही पण अचानक ‘पॉर्न स्टार ’ सन्नीने शिरकाव केला. सन्नी ही बोल्ड असल्याने तिने भट्ट कॅम्पच्या या चित्रपटासाठी चांगलीच हॉट व बोल्ड दृष्ये दिल्याची चर्चा सध्या सुरू आहे. सध्या पोस्टरवर चेहरा न दाखविता दाखविण्यात आलेली सन्नीची सेक्सी अदाची जादू प्रेक्षकांना तीन तास खिळवून ठेवणार का याचे उत्तर लवकरच पाहावयास मिळेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा