गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल विवाहबंधनांत अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी त्या दोघांचा साखरपुडा झाल्याचे बोललं जात आहे. त्यानंतर येत्या डिसेंबरमध्ये ते दोघे लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यांच्या लग्नाची तयारी सुरु असल्याचे सांगण्यात येत होते. पण त्या दोघांनी अजून काही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, एका अभिनेतयाने केलेल्या पोस्टमुळे या दोघांचे नक्कीच लग्न होणार असल्याचे कळते. पण त्या अभिनेत्याने सगळ लग्नात जाण्यास नकार दिला आहे.

बधाई हो फेम अभिनेता गजराव राव यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक स्टोरी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी कतरिना आणि विकीच्या लग्नाची एक बातमी शेअर केली आहे. त्या बातमीत लिहिलं आहे की त्यांच्या लग्नात फोन घेऊन जाण्यास परवानगी नाही. यावरून त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत ते म्हणाले, “सेल्फी काढू देणार नाही तर मी लग्नात येणार नाही.” त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

आणखी वाचा : चक्क अभिनेत्याने दिला कतरिना आणि विकीच्या लग्नात जाण्यास नकार

आणखी वाचा : मलायकाच्या ‘या’ सवयीची अरबाजला येत होती चीड

रिपोर्ट्सनुसार, विकी कौशल आणि कतरिना कैफ राजस्थानमध्ये शाही लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नाचे सगळे कार्यक्रम हे ७ ते १२ डिसेंबर दरम्यान होणार आहेत. दरम्यान, नुकताच कतरिनाचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कतरिना अक्षयसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. तर दुसरीकडे विकीचा ‘उधम सिं’ग हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.

Story img Loader