तेराव्या शतकात चेंगीझ खानने खाराखोरीन् येथे आपली राजधानी वसवली. सिल्क रुटवरील मोक्याचे ठिकाण असल्याने त्याकाळी तिथे मोठा वावर असे. त्याकाळात चेंगीझ खानने ते बऱ्यापैकी विकसित केले होते. आता मात्र तिथे पाहण्यासारख्या दोनच गोष्टी आहेत, त्या म्हणजे ईरदेन् झू खिद् व म्युझियम.

काराकोरम् म्हटलं की लगेच आपल्याला आठवतात त्या उत्तरेला हिंदुकुश पर्वतापासून हिमालयापर्यंत पसरलेल्या काराकोरम पर्वताच्या रांगा. पण दुसरे काराकोरम् म्हणजे मोंगोलिअन सम्राट चेंगीझ खानच्या साम्राज्याची राजधानी. मोंगोलिआत खान ही राजाची पदवी होती. त्यामुळे चेंगीझ हा बुद्ध धर्मीय असून चेंगीझ खान म्हणून प्रसिद्धी पावला होता. मोंगोलिआमध्ये ‘क’चा उच्चार ‘ख’ किंवा ‘ह’ असा करतात, त्यामुळे या भागाला काही जण खाराखोरीन् म्हणतात तर काही जण हाराहोरीन् म्हणतात. मोंगोलिआच्या राजधानीचे बऱ्याच वेळा राजाच्या लहरीमुळे देशात वेगवेगळ्या शहरांमध्ये स्थलांतर झाले आहे. सध्याची राजधानी उलान् बतर आहे.

Shahrukh Khan
“अबराम व आर्यनचा…”, शाहरुख खान दोन्ही मुलांसह एकत्र काम करणार; अनुभव सांगत म्हणाला…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
kalyan session and district court verdict on mandir masjid issue at durgadi fort
कल्याणमधील दुर्गाडी किल्ला शासनाच्या मालकीचा; न्यायालयाने मुस्लिम संघटनेचा दावा फेटाळला
Maval MLA Sunil Shelke , Sunil Shelke, Paragliders,
मावळला मंत्रिपद मिळण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना आकाशातून गवसणी, ११ पॅराग्लायडर्सनी ७०० फूट उंचीवरून …
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”
Tourists can now taste sweet honey along with tiger sighting at Tipeshwar Sanctuary
टीपेश्वर अभयारण्य: व्याघ्रदर्शनासोबतच मधाची चवही चाखता येणार,अंधारवाडीत साकारले पहिले ‘मधाचे गाव’
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?

तेराव्या शतकात चेंगीझ खान हा ख्वारेन् घराण्यावर चाल करून येथे आला होता. हा भाग गोबी ग्रास लँडच्या परिघावरचा, ऑरखान् नदीचा परिसर आणि सपाट भूमी असल्याने शेतीचा परिसर होता. सर्वच सोयींनी उपयुक्त अशा खाराखोरीन्मध्ये चेंगीझ खानने आपली राजधानी वसवली. राज्यकारभारही गरमधून (विशिष्ट तंबू) चालत असे. त्यामुळे जेव्हा राजधानीचे स्थलांतर होई तेव्हा ते गरसकटच होत असे. मोंगोलिआतील तापमान पक्क्या घरांसाठी योग्य नसल्याने त्याकाळी त्यांची घरे हलविता येण्यासारख्या तंबूत असत. त्यांना गर असे म्हणतात. सर्वसाधारण गर आपल्या वन बीएचके घरांच्या क्षेत्रफळासारखे. प्रत्येक गर हा मालकाच्या ऐपतीप्रमाणे लहानमोठा, सजवलेला, स्थलांतरासाठी सोयीचा म्हणून चाकांवर असतो. त्यामध्ये मग राजाचा गर म्हणजे कसा असेल याची आपल्याला कल्पना आलीच असेल.

चीनपासून निघून मोंगोलिआ, तिबेटचे पठार, तुर्कस्तान, इराण टर्की करून मेडिटरनिअन सीमधून पार इटलीपर्यंत असलेल्या जगप्रसिद्ध सिल्क रूटमुळे या टोकापासून ते त्या टोकापर्यंत व्यापार चालत असे. सिल्क रूटवरील खाराखोरीन् हे मोक्याचे ठिकाण असल्याने इथे चांगलीच वर्दळ होती. त्यात मसाल्याचे जिन्नस, चिनी बनावटीचे सिल्क, उंट अशा सामानाखेरीज भाषा, विद्या, कला, शिक्षण अशा वेगवेगळ्या विषयांची सतत देवाणघेवाण चालत असे. चेंगीझ व त्याचा मुलगा ओगेडी हे दोघेही चांगल्या गोष्टींचे चाहते असल्याने त्यांच्या राज्यात धर्मनिरपेक्षता होती. त्यामुळे कोणत्याही देशाचा, धर्माचा विद्वान अथवा चांगल्या गोष्टींचे नेहमी स्वागतच असे. जगभरातून सर्व धर्मीयांचा तिथे सतत वावर होता. आपल्याही देशातून राजे महाराजे तेथे पोहोचले होते. खाराखोरीन्मध्ये बौद्ध धर्माच्या मोनेस्ट्रींखेरीज हिंदू देवालये, कॅथलिक चर्च व मशीद होती.

65-lp-karakoram

१३व्या शतकात खाराखोरीन् हे घडामोडींचे ठिकाण होते, म्हटल्यास ते वावगे ठरू नये. ओगेडी खान याने राजधानीभोवती पक्की तटबंदी करून लाकडी खांबांच्या आधारे आपला राजवाडा बांधला. त्याचा मुलगा कुबलाई खानने राजधानी सध्याच्या बीजिंग येथे हलवली. त्याच्या मृत्यूनंतर चीनच्या मांचुरिआ भागातील सैन्याने खाराखोरीन् या भागाची पार नासधूस केली. जवळजवळ शतकभर असलेली राजधानी पुढे दुर्लक्षित होऊन जमीनदोस्त झाली.

खाराखोरीन् येथे पाहण्यासारख्या दोनच गोष्टी आहेत, त्या म्हणजे ईरदेन् झू खिद् व म्युझियम. १६व्या शतकात राजा अब्ताई खान याने ईरदेन् झु खिद् या बौद्ध धर्माच्या येथील पहिल्या मोनेस्ट्रीची स्थापना केली. मोंगोलिअन भाषेत ईरदेन् म्हणजे १०० रत्ने. तत्पूर्वीचे खाराखोरीन् आताच्या जागेपासून थोडय़ा अंतरावर होते. पूर्वी येथे १०० देवळे होती व हजारांवर बौद्ध भिख्खूंचे वास्तव्य होते, असे सांगितले जाते; पण आता त्यापैकी फक्त तीनच देवळे अस्तित्वात आहेत. यावरूनच आपल्याला याचे आवार किती मोठे असावे याची कल्पना येईलच. आवाराच्या चारही दिशांच्या भिंतीवर प्रत्येकी २५, प्रवेशावर दोन असे एकूण १०८ स्तूप आहेत.

कम्युनिझम काळात स्टालीनने मोंगोलिआतील सर्व मोनेस्ट्रीज पाडून टाकण्याचा आदेश दिला होता. त्याबरोबरच भिख्खूंच्या पण हत्या झाल्या. पण ईरदेन् झू खिद् व उलान्बातर येथील गंडेन मोनेस्ट्री मात्र वाचली कशी ते कोण जाणे! कुणी म्हटल्याप्रमाणे, आपण अगदी धर्मविरोधी नसून पुढच्या काळात या देशाची संस्कृती जगाला कळावी या उद्देशाने स्टालीनने मोनेस्ट्रीज् तशाच सोडल्या. देशाला स्थानिक नक्षल्यांचाही उपद्रव होताच. त्यामुळे ही मोनेस्ट्री बंद होती. १९९० मध्ये कम्युनिझम समाप्तीनंतर मात्र परत सुरू झाली, हळूहळू ऊर्जितावस्थेत येत आहे.

आवारातील तीन देवळांत बुद्धाचे शाक्य मुनी, दीपांकर, मैत्रेय व अवलोकितेश्वरा असे सोन्याच्या मुलाम्याचे व चार द्वाररक्षक, यक्ष असे पुतळे आहेत. आतमध्ये बौद्ध धर्माचे हस्तलिखित ग्रंथ, तलम रेशमी कापडांवरील थांका भरतकाम किंवा नैसर्गिक रंगांनी बनलेल्या आहेत. खास तिबेटी पद्धतीप्रमाणे मैदा व बकरीची चरबी यांच्यापासून शोभेच्या रंगीत आकृत्या बनवल्या आहेत. त्या कित्येक वर्षांपूर्वी बनवलेल्या आहेत, असे आम्हाला सांगण्यात आले.

63-lp-karakoram
आवाराच्या टोकाला पांढऱ्या रंगाचे देऊळ आहे. दिवसा ठरावीक वेळी लामा प्रार्थना करतात. आपण तेथे हजर असलो तर तो सोहळा पाहू शकतो. लहान मुलेही धार्मिक शिक्षण घेऊन लामा बनण्यासाठी तेथे येतात. ज्येष्ठ लामांतर्फे नागरिक धार्मिक विधी करतात. आतमध्ये फोटो घेण्यास मनाई असते. लाइफ सायकलच्या तक्त्यावरून जर आपण जन्मतारीख सांगितली तर ते जन्मदिवस, वार, तिथी व वेळ सांगतात. आवारात प्राचीनकालीन मातीच्या, दगडाच्या वस्तू इतस्तत: पडलेल्या आहेत.

आवाराबाहेर १०० फूट अंतरावर जुन्या खाराखोरीन्चे काही अवशेष आहेत. त्यापैकीच एक दगडी कासव, टर्टल रॉक आहे. भिक्खू हे संन्यासी असल्याने त्यांनी व्यभिचारापासून दूर राहावे याकरिता येथून जवळच एका टेकडीवर स्त्री व पुरुषाचे लैंगिक अवयव दाखवले आहेत. येथे ज्या दांपत्याला संतती नसेल त्यांनी येथे येऊन पूजा केली तर त्यांना संतती होऊ शकते असा समज आहे.

इथले म्युझियम लहानसेच आहे, पण वातानुकूलित बैठी इमारत असून आतली मांडणी सुबक आहे. पूर्वीच्या काराकोरम्ची लहानशी प्रतिकृती केलेली आहे. शेजारीच त्याविषयी माहिती दिली आहे. शिवाय जगात सर्वप्रथम या देशात सापडलेले डायनोसॉरचे अवशेष, विविध भागातील आर्किटेक्चरचे नमुने, मातीची भांडी, राजांचे जवाहीर अशा विविध गोष्टी आहेत. याबरोबर जमिनीत खणताना मिळालेल्या मातीच्या भट्टीचा काही भाग आहे.
64-lp-karakoram

हा परिसर ओरखान नदीचा असल्याने बाकी भागापेक्षा येथील हिरवळ नजरेला सुखावते. बाजूच्या डोंगरांमुळे झालेल्या अरुंद दरीमुळे सोसाटय़ाचा वारा असतो. गरचा दरवाजा ओढून घेताना फार कष्टप्रद होत होते. त्या रात्री वादळी वाऱ्यांमुळे गरचा दरवाजा धडधडत होता. बाहेर पडणाऱ्या पावसाच्या तुषारांनी जेव्हा जाग आली, तेव्हा बंद दरवाजा कसा उघडला ते मात्र कळलेच नाही. पण मजा आली. त्यामानाने बऱ्यापैकी लोकसंख्या असलेल्या खाराखोरीन्मध्ये वीज बिनभरवशाची. टेलीफोनची व्यवस्था नाही. एक बँक व एकच एटीएम सेंटर आहे. या दुर्गम भागात कधीतरीच इंटरनेट सुविधा मिळू शकते, पण फारच सावकाश असते. तरीपण ही नैसर्गिक विविधता अनुभवायची असेल तर आपल्याला मोंगोलिआला भेट द्यावी लागेल. काही टूर कंपनींमार्फत आपण या देशाच्या वेगवेगळ्या भागात पर्यटन करू  शकतो, पण एकटय़ा दुकटय़ाने प्रवास करण्याची जागा नाही.
गौरी बोरकर

Story img Loader