महाराष्ट्रासह देशभर जात आणि धर्माच्या नावावर मानवी समाजात दुही निर्माण करण्याचे राजकारण सुरु आहे.सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या नावाखाली सांस्कृतिक दहशत मजवण्याचं काम सरू आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली सांस्कृतिक दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी जानेवारीत कोल्हापूरची शाहूनगरी ते मुंबईच्या चैतभूमी पर्यंत लॉंग मार्च काढणार आहे, अशी घोषणा प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी रविवारी येथे केली. या मध्ये राज्यातून२५ हजार लोक होणार सहभागी होणार असल्याचा दावाही त्यांनी केला.

प्रागतिक लेखक संघ, निर्मिती विचारमंच, धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट, सन्मान फौंडेशन यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अमृतमहोत्सवी वर्षा निमित्त केलेल्या कवी, लेखक, साहित्यिक, विचारवंत, कलावंत व संवेदनशील कार्यकर्ते यांच्याकडून ग्रंथतुला व ७५ हजार संघर्ष निधी देऊन प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा नागरी सत्कार येथे लेखक व समीक्षक डॉ. गिरीश मोरे व ज्येष्ठ विचारवंत प्रा. टी. के. सरगर यांच्या हस्ते करण्यात आला. या निधी मध्ये त्यांनी स्वतःचे २५ हजार व भूपाल शेट्टी यांनी दिलेले २५ हजाराची रक्कम निधी धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टला दिला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नंदकुमार गोंधळी हे होते.

या वेळी प्रा. कवाडे यांची प्रकट मुलाखत डॉ. मोरे यांनी घेतली. भूपाल शेट्टी, प्रा. सरगर यांची मनोगते झाली. प्रास्ताविक निमंत्रक अनिल म्हमाने यांनी केले. मानपत्राचे वाचन ॲड. करुणा विमल यांनी केले. सूत्रसंचालन सनी गोंधळी तर आभार रतन कांबळे यांनी मानले. यावेळी विविध सामाजिक क्षेत्रात बांधिलकी मानून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचाही सत्कार करण्यात आला.

Story img Loader