(संगकाराची जर्सी परिधान केलेला चंपक येतो)
तोताराम : लगेच कशी जर्सी मिळते तुम्हाला अशी?
चंपक : फॅक्टरीच आहे जर्सीची. आवडत्या खेळाडूने चांगली कामगिरी केली की लगेच बनवून घेतो. मजाक
तोताराम : हे बरं केलंत. नंतर धावाधाव नको.
चंपक : तुम्ही वर्णन केलंत संगकारा पेटलाय. अगदी तस्संच खेळला. मॅचमधले बहुतांशी विक्रम त्याच्याच नावावर. वेडा झालाय संगा.
तोताराम : बऱ्या मराठीत याला ‘परपल पॅच’ म्हणतात. हात लावेल ते सोनं म्हणतात ती स्थिती जवळपास. संगकाराच्या कारकीर्दीत असा पॅच येणं म्हणजे प्रतिस्पर्धी भुईसपाट.
चंपक : अगदी मनातलं बोललात. आता एबीची जर्सी घालू?
(विठ्ठलपंत हिरवं कार्ड हाती देतात)
तोताराम : दक्षिण आफ्रिकेचं सीसॉ सुरू आहे. हरले की पुढच्या मॅचमध्ये जागे होतात आणि एकदम दणकेबाज विजय मिळवतात. अमिरातीविरुद्ध हेच होईल. हशिम अमलाला कसोटीसारखी इनिंग खेळायला मिळू शकते. क्विंटन डी कॉकला याच्यापेक्षा सोपं काहीच मिळू शकत नाही. एबीला खिरापत आहे. कायले अॅबॉट अमिरातीला त्रास देऊ शकतो. डेल स्टेन अजून जागा झालेला नाही. अमिरातीसाठी शैमान अन्वर महत्त्वाचा.
चंपक : जर्सीबदलाची वेळ झाली. रजा घेतो तुमची.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा