सिंह : अडथळे कमी होतील

अमावास्या तुमच्याच राशीतून होत आहे. मंगळ धनस्थानात कन्या राशीत, शुक्र तूळ राशीत पराक्रम स्थानात ५ सप्टेंबर रोजी प्रवेश करेल. गणेश चतुर्थीला चांगल्या गोष्टींच्या कामाचा श्रीगणेशा होईल. श्रीगणेश आगमनाची तयारी नियोजनात्मक कराल. आनंदीमय वातावरण असेल. नोकरदार वर्गाला कामकाजातील अचूक गोष्टींचा तपशील ठेवता येईल. हाती घेतलेले काम पूर्ण होईल. व्यावसायिदृष्ट्या होत असलेले बदल अंगवळणी पडतील.

नवीन संकल्पना मार्गी लागतील. कला क्षेत्रात असलेल्यांना प्राधान्य मिळेल. अपेक्षित परिस्थिती निर्माण होईल. आर्थिकदृष्ट्या अडथळे कमी होतील. सामाजिक क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होईल. शेजारधर्माविषयी आपुलकी वाटेल. कुटुंबातील सदस्यांशी बोलताना मोठ्या आवाजात बोलू नका. प्रकृतिस्वास्थ्य उत्तम राहील.

शुभ दिनांक : ८, ९

महिलांसाठी : कष्टसाध्य होतील.

स्मिता अतुल गायकवाड

Story img Loader