तूळ : व्यस्त कामकाज राहील

अमावास्या सिंह राशीतून लाभस्थानात होत आहे. मंगळ कन्या राशीत व्ययस्थानात व शुक्र तूळ राशीत प्रथम स्थानात ५ सप्टेंबर रोजी प्रवेश करेल. दिनांक ८ व ९ रोजी मोठे निर्णय घेऊ नका. वादविवादापासून लांब राहा. इतरांपेक्षा स्वत:साठी वेळ द्या.

श्रीगणेशाचे आगमन आनंदाने पार पाडाल. सणाचे औचित्य साधाल. नोकरदार वर्गाला व्यस्त कामकाज राहील. खरेदी-विक्री व्यवसायातील अडथळे कमी होतील. गुंतवणुकीतून फायदा होईल. ग्राहकांशी प्रत्यक्ष संपर्क वाढेल. ग्राहकांना हव्या असलेल्या वस्तूंचे उत्पादन वाढवणे गरजेचे राहील. नफ्याचे प्रमाण वाढलेले असेल. राजकीय क्षेत्रात इतरांच्या मर्जीने निर्णय घ्यावे लागणार नाही. मैत्रीच्या नात्यातील गोडवा वाढेल. घरगुती वातावरण सणावारानिमित्त हसतेखेळते राहील. आध्यात्मिक गोष्टींचा पगडा राहील. आरोग्याच्या बाबतीत सुधारणा वाटेल.

शुभ दिनांक : ७, १०

महिलांसाठी : प्रत्येक गोष्टीमध्ये अग्रेसर राहाल.

स्मिता अतुल गायकवाड

Story img Loader