बडय़ा उद्योगांमध्ये खाणकाम, लोह व पोलाद, वस्त्रोद्योग, पायाभूत सोयीसुविधा आणि हवाई उड्डाण उद्योग या पाच उद्योग क्षेत्रातून कर्जे थकण्याचे प्रमाण तर २४.२ टक्के इतके आहे. बँकांच्या एकूण कर्ज-थकितात यांचाच निम्म्याहून अधिक ५३ टक्के वाटा आहे. उड्डाण क्षेत्रात तर चालू वर्षांत मार्चपासून प्रत्येक वितरित १०० रुपये कर्जापैकी ६१ रुपयांच्या परतफेडीबाबत साशंकतेची स्थिती असल्याचे, या क्षेत्रातील ६१ टक्क्य़ांवर पोहोचलेल्या थकिताच्या स्थितीतून दिसून येते. रस्ते, महामार्ग, ऊर्जा प्रकल्प, बंदरे आदी पायाभूत क्षेत्राला वितरित प्रत्येक १०० रुपयांपैकी २४ रुपयांची परतफेड धोक्यात आली आहे.
उड्डाण क्षेत्रात वितरीत १०० रुपये कर्जापैकी ६१ची परतफेड साशंक!
बडय़ा उद्योगांमध्ये खाणकाम, लोह व पोलाद, वस्त्रोद्योग, पायाभूत सोयीसुविधा
Written by लोकसत्ता टीमविश्वनाथ गरुड
First published on: 24-12-2015 at 08:06 IST
Web Title: Loan repayment dubious