भाषाभ्यासात व्याकरणाला महत्त्वाचे स्थान आहे. भाषाप्रेमी मनुष्याला काही आले नाही तरी चालेल, परंतु व्याकरण आलेच पाहिजे. भाषा व व्याकरण या बाबी परस्परपूरक, परस्परसंवर्धक व परस्परावलंबी आहेत, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.
संधी- जोडशब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकांत मिसळून एक वर्ण तयार होतो, वर्णाच्या ह्य़ा एकत्र येण्यास संधी म्हणतात.
१) स्वरसंधी – दोन स्वर एकमेकांजवळ आल्यानंतर त्याचा एकस्वर होतो, त्याला स्वरसंधी म्हणतात.
२) व्यंजनसंधी – जळजवळ येणाऱ्या वर्णापैकी दोन्ही वर्ण व्यंजने किंवा दुसरा वर्ण स्वर आल्यास त्यास ‘व्यंजन संधी’ असे म्हणतात.
३) विसर्गसंधी – एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण विसर्ग व दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असल्यास होणाऱ्या संधीला ‘विसर्ग संधी’ असे म्हणतात.
शब्दांच्या जाती – शब्दांच्या आठ जाती असून शब्दांचे दोन प्रकार आहेत.
१) नाम – प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा काल्पनिक वस्तूचे किंवा गुणधर्माचे नाम.
२) सर्वनाम – नामाऐवजी वापरले जाणारे शब्द.
३) क्रियापद – क्रियेचा आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द.
४) क्रियाविशेषण अव्यय – क्रियेचे स्थळ-काळ, प्रमाण, रीत दर्शवणारा शब्द किंवा क्रियेची अधिक माहिती सांगणारा शब्द.
५) शब्दयोगी अव्यय- वाक्यातील एखाद्या शब्दाला जोडून येणारा शब्द.
६) केवलप्रयोगी अव्यय – सहजपणे उद्गारातून भावना व्यक्त करणारा शब्द.
७) उभयान्वयी अव्यय – दोन शब्द वा दोन वाक्ये जोडणारा शब्द.
म्हणी – दीर्घ अनुभवावर आधारित छोटे पण भरपूर अर्थ असलेले वाक्य म्हणजे ‘म्हण’ होय. म्हणी बोधप्रद, चटकदार आणि आटोपशीर असतात. त्यांची रचना यमकयुक्त, अनुप्रासयुक्त असते. त्यामुळे म्हणी सहज लक्षात राहतात.
वाक्प्रचार- वाक्य प्रचारातील शब्दांना शब्दश: असलेल्या अर्थापेक्षा एक वेगळाच अर्थ प्राप्त झालेला शब्दसमूह होय. वाक्प्रचाराच्या वापरामुळे भाषेचा विकास होतो.
लिंगविचार- एखादी वस्तू प्रत्यक्ष किंवा काल्पनिक पुरुष जातीची किंवा स्त्री जातीची आहे किंवा दोन्हींपेक्षा वेगळ्या जातीची आहे हे तिच्या नामाच्या रुपावरून समजते, त्याला लिंग असे म्हणतात. लिंगे तीन प्रकारची आहेत.
१) पुल्लिंग – नामाच्या एकवचनी रुपाने ‘तो’ शब्द लागू होत असल्यास (तो फळा, तो खडू)
२) स्त्रीलिंग – नामाच्या एकवचनी रुपाने ‘ती’ शब्द लागू झाल्यास ( ती खुर्ची, ती सुई)
३) नपुसकलिंग – नामाच्या एकवचनी रुपाने ‘ते’ शब्द लागू झाल्यास (ते झाड, ते आकाश)
विरामचिन्हे- वाचताना वाक्य कोठे संपते, प्रश्न कोठे आहे, उद्गार कोणता, वाक्यात कोठे किती थांबावे हे समजण्यासाठी जी वाक्यात चिन्हे वापरली जातात त्यांना विरामचिन्हे म्हणतात. प्रकार : पूर्णविराम (.), अर्धविराम (;), स्वल्पविराम (,), अपूर्ण विराम (:), प्रश्नचिन्ह (?), उद्गारचिन्ह (!), अवतरण चिन्हे (‘ ’, ‘‘ ’’), संयोग चिन्ह (-), अपसारण चिन्ह (स्पष्टीकरणासह (-), लोपचिन्ह (..), दंड (।।), अवग्रह (२), विकल्पचिन्ह (/)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्णविचार
१) भाषा- विचार व्यक्त करण्याचे साधन.
२) लिपी- आवाजांच्या किंवा ध्वनींच्या सांकेतिक खुणांनी आपण जे लेखन करतो त्याला लिपी म्हणतात.
३) देवनागरी- मराठी भाषेचे लेखन मराठी बालबोध लिपीत म्हणजेच देवानगरी लिपीत करतो.
४) व्याकरण- भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र.
५) वाक्य- पुऱ्या अर्थाचे बोलणे प्रत्येक विचार पुऱ्या (पूर्ण) अर्थाचा असेल तर ते वाक्य.
७) शब्द- ठरावीक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाला तरच त्यास शब्द म्हणतात.
७) अक्षरे- ध्वनींच्या किंवा आवाजाच्या खुणांना अक्षरे म्हणतात. पूर्ण उच्चारले जाणारे वर्ण, सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने यांना अक्षरे म्हणतात.
८) वर्ण- आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. मराठीत ४८ वर्ण आहेत.
९) स्वर- ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर म्हणतात. एकूण २२ स्वर आहेत व स्वरादी २ आहेत.
१०) व्यंजने- ज्या वर्णाचा उच्चार पूर्ण करण्यासाठी शेवटी ‘अ’ (परवर्ण) या स्वराचे साहाय्य घ्यावे लागते, अशा वर्णाना व्यंजने म्हणतात. एकूण ३४ व्यंजने आहेत.