भारतीय जवानांनी दहशतावाद्यांचा मोठा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. मध्यरात्री २.३० वाजेच्या सुमारास जम्मू-काश्मीरमधील मच्छल सेक्टरमध्ये पाच ते सहा दहशतावादी घुसखोरीच्या प्रयत्नात होते. यावेळी झालेल्या चकमकीत एक जवान जखमी झाला, त्याला लष्करी रूग्णालयात हलवण्यात आले आहे.
साधारण पाच ते सहा दहशतावादी जवळपास ५०० मीटर आत भारतीय हद्दीत घुसले होते. त्यांना भारतीय जवानांनी पिटाळून लावले. यावेळी मोठ्या प्रमाणात चकमक देखील झाली. ज्यामध्ये एक जवान जखमी झाला, असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Indian Army: Major Infiltration bid foiled in Macchal Sector of J&K at 2:30 AM today. 5-6 terrorists infiltrated 500m into Indian territory, in exchange of fire one soldier injured and evacuated. pic.twitter.com/q0SpmxoeYD
— ANI (@ANI) August 6, 2019
केंद्र सरकाने सोमवारी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याच निर्णय घेतल्यानंतर काश्मीर खोऱ्यात संभाव्य घातपाताची शक्यता लक्षात घेत, या ठिकाणी अधिक सैन्य तैनात करण्यात आले आहे. फुटीरतावादी नेते व दहशतवादी घातपात घडवून आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे.