त्याकरता मिटकॉन (महाराष्ट्र इंडस्ट्रिअल अॅण्ड टेक्निकल कन्सल्टन्सी ऑर्गनायझेशन) या संस्थेतर्फे चालविण्यात येणारा ‘हर्बल कॉस्मेटिक सर्टििफकेट कोर्स’ उपयुक्त ठरू शकतो. या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन प्रकारचा आहे- १० रविवार किंवा सलग तीन आठवडे. या अभ्यासक्रमात ऑइल, लोशन, साबणनिर्मिती, जेल, क्रीम आधारित पाच प्रकारच्या सौंदर्य उत्पादनाच्या निर्मितीचे कौशल्य शिकवले जाते. ऑइल आधरित उत्पादनामध्ये केस आणि मसाजसाठी उपयुक्त ठरणाऱ्या तेलांचा समावेश आहे. लोशन या प्रकारात क्लििन्सग आणि बेबी लोशन यांचा समावेश आहे. साबणनिर्मितीत हॅण्ड वॉश, हर्बल सोप, अॅण्टी डँड्रफ, फेश वॉश, शाम्पू यांचा समावेश आहे. जेल या प्रकारात काकडी, संत्रे, कोरफड यांच्या जेल निर्मितीचा समावेश आहे. क्रीमनिर्मितीत अॅण्टी अॅक्ने, फूट, फ्रुट मसाज, स्क्रब आणि कोणत्याही बाबीसाठी वापरता येऊ शकेल अशा क्रीम्सचा समावेश आहे.त्याशिवाय ओठ आणि वेदनाशामक बामनिर्मितीचे कौशल्यही शिकवले जाते. उत्पादनांच्या निर्मितीप्रक्रियेसोबतच उद्योजकता विकासाचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये औद्योगिक प्रतिष्ठानांना भेटी, प्रकल्प अहवाल तयार करणे, शासकीय परवाने मिळवण्याची प्रक्रिया, बँकेकडून कर्ज मिळवण्याची प्रक्रिया यांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमांमध्ये प्रात्यक्षिकांवर अधिकाधिक भर देण्यात येतो. यंत्रसामग्री व इतर साहित्य उपकरणांची सविस्तर माहिती दिली जाते. उत्पादनांच्या शास्त्रीय सूत्रांची टिपणे दिली जातात.
पत्ता: मिटकॉन उद्योग प्रबोधिनी, कृषी महाविद्यालय आवार, जिल्हा उद्योग केंद्राच्या शेजारी, शिवाजी नगर, पुणे- ४१०००५.
ई-मेल: msdc@mitconindia.com
वनऔषधींपासून सौंदर्यप्रसाधनांची निर्मिती
सौंदर्यप्रसाधन क्षेत्राची झपाटय़ाने वाढ होत आहे. मात्र, रासायनिक गुणधर्म असलेल्या प्रसाधनांचे होणारे दुष्परिणाम स्पष्ट होऊ लागल्याने वनौषधीयुक्त सौंदर्यप्रसाधनांच्या निर्मितीला चालना मिळत आहे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-04-2015 at 07:34 IST
Web Title: Making beauty products from ayurvedic trees