देसी गर्ल ते क्वांटिको असा प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा आता खऱ्या अर्थाने विदेशी सून झाली आहे. अमेरिकन पॉप गायक निक जोनाससोबत प्रियांकाने जोधपूरमध्ये लग्न केलं. निक प्रियांकाने हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने लग्न केलं आहे. या रॉयल वेडिंगनंतर प्रियांका आता मिसेस जोनान्स झाली असून निकच्या आईने नव्या सुनबाईंच खास पद्धतीने स्वागत केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निकची आई डेनिस जोनान्स आणि प्रियांका या दोघींमध्ये बॉण्डींग असून त्या सासू-सुनेपेक्षा एकमेकांच्या मैत्रिणी असल्यासारखं जास्त वावरतात. प्रियांकाच्या प्रिन्स्टर्स पार्टीमध्ये याचा प्रत्यय आला होता. लग्नापूर्वी प्रियांकाने आयोजित केलेल्या प्रिन्स्टर्स पार्टीमध्ये मधू चोप्रा आणि डेनिस जोनान्स या दोघीही उपस्थित होत्या. यावेळी प्रियांकाने डेनिस यांच्यासोबत डान्सही केला होता. तेव्हापासून या दोघींची मैत्री किती खोल आहे हे दिसून आलं होतं. त्यानंतर आता प्रियांका अधिकृतपणे जोनान्स कुटुंबाची सून झाल्यामुळे डेनिस यांनी आपल्या लाडक्या सुनेला सर्वात महागड आणि तेवढंच मौल्यवान गिफ्ट दिलं आहे.


डेनिस यांनी प्रियांकाला तब्बल ७९ हजार ५०० डॉलर्सचे कानातले (इअररिंग्ज) भेट म्हणून दिले आहेत. या कानातल्याची किंमत भारतीय चलनानुसार ५५.४६ लाख रुपये इतकी आहे. या कानातल्यांचं वजन ६.७ कॅरेट असून त्यात १७० लहान लहान हिरे जोडण्यात आले आहेत. त्यामुळे सासूकडून मिळालेलं हे गिफ्ट प्रियांकासाठी फारच मौल्यवान आहे.

दरम्यान, निक प्रियांकाने जोधपूरमध्ये लग्न केल्यानंतर ही जोडी मुंबईसाठी रवाना झाली आहे. मुंबईत पोहोचल्यानंतर ते लवकरच बॉलिवूड सेलिब्रेटींसाठी रिसेप्शन पार्टी देणार आहेत.

 

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mama jonas priyanka costly gift worth rs 55 46 lakh