तापमानाची विपरीतता पुढील गोष्टींमुळे होते..
* निरभ्र आकाश : यामुळे उष्णतेचे उत्सर्जन अडथळ्याशिवाय वेगाने होते. उष्णेतेचे उत्सर्जन झाल्यामुळे जमीन थंड होते. त्यामुळे जमिनीलगतचा हवेचा थर थंड होतो व त्या तुलनेमुळे हवेचे वरचे वातावरण उबदार राहते. त्यामुळे जसजशी उंची वाढली तसतसे तापमान कमी न होता वाढलेले आढळते.
* पर्वतमय प्रदेश : जर डोंगराळ भाग असेल तर थंड हवा तिच्या वजनामुळे खाली सरकते व उष्ण हवा वर येते.
* रात्रीचा कालावधी मोठा असेल तर- उदा. हिवाळ्यामध्ये जमिनीतून होणारे उष्णतेचे उत्सर्जन मोठय़ा प्रमाणात होते, म्हणून जमिनीलगतचा थर थंड हवेचा असतो तर त्याच्या वरचा थर उष्ण हवेचा असतो.
* हिमाच्छादित भूपृष्ठ भाग : जमिनीवरील भूपृष्ठभाग हिमाच्छादित असेल तर या पृष्ठभागावरून सूर्यकिरणांचे परावर्तन जास्त होते, त्यामुळे जमिनीजवळचा पृष्ठभाग थंड राहतो तर वरचा पृष्ठभाग उष्ण राहतो.
तापमान कक्ष : पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणच्या तापमानाचा अभ्यास करताना खालील तापमान कक्षांचा विचार केला जातो- दैनिक तापमान कक्षा आणि वार्षकि तापमान कक्षा.
* दैनिक तापमान कक्षा : २४ तासांपकी कमाल तापमान व किमान तापमान यांतील फरकाला ‘दैनिक तापमान कक्षा’ असे म्हणतात. या कक्षेची वैशिष्टय़े पुढीलप्रमाणे आहेत-
* वाळंवटी प्रदेशात दैनिक तापमान कक्षा जास्त असते.
* सागर किनाऱ्यांपेक्षा खंडांतर्गत भागात दैनिक तापमान कक्षा जास्त असते.
* विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे गेल्यास दैनिक तापमान कक्षा वाढत जाते.
* सर्वसाधारण जमिनीपेक्षा हिमाच्छादित भागात दैनिक तापमान कक्षा जास्त असते.
* ओलावा असणाऱ्या जमिनीवर दैनिक तापमान कक्षा कमी असते.
वार्षकि तापमान कक्षा (Annual Range of Temperature) : उन्हाळ्यातील कमाल तापमान व हिवाळ्यातील किमान तापमान यांतील फरकाला ‘वार्षकि तापमान कक्षा’ असे म्हणतात. वार्षकि तापमान कक्षेतील खालील वैशिष्टय़े विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावीत-
* समुद्र किनाऱ्यापेक्षा खंडांतर्गत प्रदेशात वार्षकि तापमान कक्षा जास्त असते.
* विषुववृत्ताजवळ वर्षभराचे तापमान जवळपास सारखेच असते, कारण विषुववृत्तावर दुपापर्यंत तापमान जास्त असते आणि दुपारनंतर पावसासारखी स्थिती होते. अशा पद्धतीचे वातावरण वर्षभर आढळते, म्हणून विषुववृत्ताजवळ वार्षकि तापमान कक्षेत फारसा फरक आढळत नाही.
* उष्ण कटिबंधीय प्रदेशात वार्षकि तापमान कक्षेत फारसा फरक आढळत नाही तर समशीतोष्ण व शीत कटिबंधात वार्षकि तापमान कक्षेत फरक हा जास्त असतो.
तापमानाचे क्षितिजसमांतर वितरण :
अक्षांशानुसार तापमानाचे क्षितिजसमांतर वितरण : विषुववृत्तापासून उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे गेल्यास तापमानात फरक पडत जातो. या फरकानुसारच पृथ्वीवरील तापमानाचे तीन कटिबंधांत विभाजन केले आहे- उष्णकटिबंधीय, समशीतोष्ण कटिबंधीय, शीतकटिबंधीय.
* उष्णकटिबंधीय (Tropical zone): कर्क व मकरवृत्त यांदरम्यान असलेल्या पट्टय़ाला उष्णकटिबंधीय पट्टा असे म्हणतात. यात सर्वात जास्त तापमान असते. (२३ १/२त् उत्तर ते २३ १/२त् दक्षिण या दरम्यानचा पट्टा )
* समशीतोष्ण कटिबंधीय (Temperate Zone) : उत्तर गोलार्धात कर्कवृत्त ते उत्तर ध्रुववृत्त (२३ १/२त् उत्तर ते ६६ १/२त् उत्तर) आणि दक्षिण गोलार्धात मकरवृत्त ते दक्षिण ध्रुववृत्त (२३ १/२त् दक्षिण ते ६६ १/२त् दक्षिण) या दरम्यान असलेल्या पट्टय़ाला ‘समशीतोष्ण कटिबंधीय पट्टा’ असे म्हणतात.