सचिन रोहेकर sachin.rohekar@expressindia.com

म्युच्युअल फंडाचा ‘सामायिक सेवा’ उपक्रम म्हणजे ‘एमएफ युटिलिटी इंडिया प्रा. लिमिटेड (एमएफयू)’ ही कंपनी. म्युच्युअल फंडांमध्ये सर्वदूर पातळीवरून आणि विविध स्त्रोतांतून गुंतवणूक गोळा व्हावी या उद्देशाने ‘सेबी’कडे नोंदणीकृत मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांनी (एएमसी) स्थापन केलेले हे सामायिक व्यासपीठ आहे. गत सात वर्षांत अपेक्षेपेक्षा सरस कामगिरी करणाऱ्या ‘एमएफयू’ने वितरकांना त्यांच्या व्यवसायवाढीत मौल्यवान मदत देण्यासह, नवीन क्षेत्रातून गुंतवणूकदारांच्या संख्येत वाढीलाही हातभार लावला आहे. म्युच्युअल फंड उद्योगाची व्याप्ती आणि खोली वाढवण्याच्या दृष्टीने या व्यासपीठाच्या भूमिकेवर एमएफयूचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश राम यांनी टाकलेला हा प्रकाश..

Infosys Q3 Results Highlight: Net profit rises 11 percent
इन्फोसिसला ६,८०६ कोटींचा तिमाही नफा; ११ टक्क्यांची अपेक्षेपेक्षा सरस वाढ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Reliance Industries Q3 results,
रिलायन्स इंडस्ट्रीजचा तिमाही नफा वाढून १८,५४० कोटींवर; शेअरच्या भाव वाढेल काय, विश्लेषकांचे अंदाज काय?  
Chandrapur district bank recruitment
चंद्रपूर : जिल्हा बँक नोकर भरती; खासगी बाऊन्सर लावून मुलाखती अन्‌‌ शंभर कोटींचा…
Dr Kartik Karkera from Mumbai
मुंबईचा डॉ. कार्तिक करकेरा नाशिक मविप्र मॅरेथॉन -२०२५ चा विजेता, पहिले तीनही धावपटू महाराष्ट्रातील
Fund Jigyaza Wealth Creation Through SIP
फंड जिज्ञासा – ‘एसआयपी’च्या माध्यमातून संपत्ती निर्मिती
Industrial production rises to six month high of 5 2 in November print eco news
देशाची कारखानदारी रूळावर येत असल्याची सुचिन्हे!  नोव्हेंबरमध्ये औद्योगिक उत्पादन सहा महिन्यांच्या उच्चांकी  ५.२ टक्क्यांवर
SEBI is now also obsessed with AI to speed up the process Claims that work is underway on more than a dozen projects print eco news
प्रक्रियेत गतिमानतेसाठी सेबीचाही आता ‘एआय’ ध्यास! डझनभराहून अधिक प्रकल्पांवर काम सुरू असल्याचा दावा

) सरलेले वर्ष हे म्युच्युअल फंड गंगाजळीत पडलेली भर आणि एकूण गुंतवणूक खात्यांतील वाढ अशा दोन्ही अंगाने विक्रमी कामगिरीचे वर्ष राहिले. एमएफयू व्यासपीठाला या काळात मिळालेला प्रतिसाद कसा होता?

गणेश राम: आर्थिक वर्ष २०२१-२२ हे सर्वागाने अविस्मरणीय कामगिरीचे वर्ष आहे. एप्रिल ते ३१ डिसेंबर २०२१ या नऊ महिन्यांत ८२ लाख इतक्या संख्येने गुंतवणुकीचे व्यवहार या व्यासपीठावरून झाले. आधीच्या संपूर्ण आर्थिक वर्षांतील ८३ लाख व्यवहारांची बरोबरी साधणारी कामगिरी यंदा नऊ महिन्यांतच पूर्ण केली गेली. गुंतवणूकदृष्टय़ा भरभराटीचा हंगाम म्हणून प्रचलित जानेवारी ते मार्च या शेवटच्या तीन महिन्यांत व्यवहार दुपटीने वाढण्याची आशा आहे. एमएफयूवर बिगर वाणिज्य व्यवहारांचे म्हणजेच बँक, मोबाइल क्रमांक, पत्ता अथवा नावांतील दुरुस्ती, नॉमिनीच्या नावांत बदल वगैरेंचे प्रमाणही गत नऊ महिन्यांत १५.४० लाख इतके होते.

) देशाच्या निवडक भागांतून गुंतवणुकीचा ओघ येत असल्याचे दिसते काय?

गणेश राम: आश्चर्यकारकरीत्या म्युच्युअल फंड उद्योगाच्या नकाशावरील टी-१५ (अव्वल १५ शहरे) व्यतिरिक्त देशातील छोटी शहरे आणि नगरांतून ज्यांना आपण तृतीय श्रेणी (टियर-३) शहरे म्हणतो, तेथून येणारा ओघ उत्साहवर्धक आहे. महाराष्ट्रात मुंबई-पुण्याव्यतिरिक्त, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर येथून नव्याने गुंतवणूकदार येत असल्याचे आढळून येते. हे व्यासपीठच असे आहे की, अगदी दुर्गम खेडय़ातून आणि रविवारी सुटीच्या दिवशीही गुंतवणूक ते शक्य बनविते.

देशातील अव्वल १५ शहरांतून (टी-१५) आलेल्या गुंतवणूकदारांमध्ये एकतृतीयांश हे मिलेनियल्स (तिशीच्या आतील) आहेत. ‘अ‍ॅम्फी’कडे नमूद तपशिलानुसार, बडय़ा १५ शहरांव्यतिरिक्त (बी-१५) देशाच्या अन्य भागांतून म्युच्युअल फंडात येणाऱ्या गुंतवणुकीचे प्रमाण हे सरासरी १८ टक्के आहे, तर हेच प्रमाण एमएफयू व्यासपीठासाठी किती तरी सरस २५ टक्के असे आहे.

) वशेषत: करोनाकाळात एमएफयूने वितरकांच्या व्यवसाय वाढीत कशी मदत केली?

गणेश राम: एमएफयू हे वैशिष्टय़पूर्ण आणि वितरकांसाठी व त्यांच्या ग्राहकांसाठी एक तंत्रज्ञानसुलभ कार्यक्षम व्यासपीठ आहे. म्हणूनच जेव्हा संचारावरील निर्बंधांमुळे या उद्योगात कोणतेही भौतिक व्यवहार शक्य नव्हते तेव्हा वितरकांनी त्यांचा व्यवसाय अनेक पटींनी वाढताना पाहिला आहे. २०१५ सालात सुरुवात झाली तेव्हा वर्षांला २,३०० नवीन म्युच्युअल फंड वितरक या व्यासपीठावर दाखल होण्याची सरासरी होती. एप्रिल ते डिसेंबर अशा गत नऊ महिन्यांत त्यात चार पटींची वाढ होऊन ती ८,२०० वर गेली आहे. सध्याच्या घडीला देशभरातून ३६ हजारांच्या घरात वितरकांनी या व्यासपीठावर नोंदणी केलली आहे. महिन्यांतून किमान एक व्यवहार हा सक्रियतेचा निकष धरल्यास त्यापैकी १६,५०० हे सक्रिय वितरक आहेत.

) देशातील किती फंड घराणी एमएफयू व्यासपीठावर त्यांच्या योजनांसह दाखल झाले आहेत?

गणेश राम: आनंदाची गोष्ट म्हणजे जवळपास सर्वच फंड घराणी आणि सध्या बाजारात उपलब्ध १०० टक्के योजना सध्या या व्यासपीठावर उपलब्ध आहेत. सर्व मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या (एएमसी) या एमएफयूच्या समान भागधारक असून, नवागत सॅम्को म्युच्युअल फंडही त्यात सहभागी आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही किफायतशीर आणि सुलभ करण्याच्या उद्देशाने एएमसी, वितरक, रजिस्ट्रार, हस्तांतरण एजंट आणि गुंतवणूकदार यांना एकाच व्यासपीठावर आणणारे ही एक म्युच्युअल फंड उद्योगाने विकसित केलेली पायाभूत सुविधा आहे, हे उत्तरोत्तर सर्वाच्या ध्यानी येत आहे.

) आगामी काळाच्या दृष्टीने आव्हाने आणि संधी कोणकोणत्या दिसून येतात?

गणेश राम: आगामी दोन वर्षे हा भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने सुवर्णकाळ असेल. याबाबत अनेक प्रतिष्ठित विश्लेषक आणि जागतिक संस्थांमध्येही एकमत दिसून येते. करोनाने पुन्हा डोके वर काढले असल्याने अनिश्चिततेचा पैलू पूर्णपणे दूर झालेला नाही. तरी २०२० मधील दुसऱ्या लाटेप्रमाणे त्याचे संहारक रूप दिसू नये, हीच अपेक्षा. संभाव्य तिसरी लाट हेच आमच्यापुढील आव्हान आहे. त्या उलट संधीचे दालन खूप विपुल आहे. देशात सध्या ९ कोटींहून अधिक ‘पॅन’धारक आहेत. तर म्युच्युअल फंडातील ‘फोलियो’ अर्थात गुंतवणूक खात्यांची संख्या मोठी असली तरी प्रत्यक्ष गुंतवणूकदारांची संख्या जेमतेम ३ कोटी इतकीच आहे. त्यामुळे ‘पॅन’धारकातील उर्वरित सहा कोटींना गुंतवणूकदार म्हणून म्युच्युअल फंडांकडे वळविणे या उद्दिष्टांनुसार आमची वाटचाल सुरू आहे. देशातील आमच्यासारखीच अन्य व्यासपीठे हे मासिक ३६,००० कोटी रुपयांच्या उलाढालीची सरासरी गाठत असताना, एमएफयू व्यासपीठावरून डिसेंबर २०२१ मध्ये झालेल्या उलाढालीची मात्रा ही २.७० लाख कोटी रुपयांच्या घरात जाणारी होती. हे पाहता याची जबाबदारी इतरांपेक्षा अधिक एमएफयूवरच मोठी आहे.

६) येत्या काळासाठी काही नवीन उपक्रम योजले आहेत काय?

गणेश राम: संपूर्णपणे अंतर्गत स्रोतांतून विकसित केलेले ‘एमएफयू बॉक्स’ हे अत्याधुनिक बॅक-ऑफिस सोल्यूशनकडून होऊ घातलेला बदल वितरक आणि गुंतवणूकदार दोहोंसाठी मोठा उपकारक ठरेल. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने किती गोष्टी सुलभ होतात याचा हा नमुना ठरेल. म्युच्युअल फंडांबरोबरीनेच, परिपूर्ण वित्तीय सेवांचे दालन त्या निमित्ताने सर्वासाठी खुले केले जाणार आहे. सध्या चाचणी-परीक्षणे सुरू असून, लवकरच त्याचे अनावरण केले जाईल.

Story img Loader