भारतीय नौदलात युवतींसाठी उपलब्ध असलेल्या करिअर संधींची ओळख आणि कित्तूर येथील स्कूल ऑफ गर्ल्स या निवासी सैनिकी शाळेच्या प्रवेशप्रक्रियेची माहिती..
नौदलात युवतींना संधी
नौदलातील विविध कार्यकारी शाखांमध्ये शॉर्ट सíव्हस कमिशनद्वारे युवतींना करिअर करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. रिक्त जागांच्या उपलब्धतेनुसार शिक्षण, विधि आणि नेव्हल आíकटेक्चर या विद्याशाखांमध्ये कायमस्वरूपी कमिशन देण्यात येते.
विविध शाखा
लॉजिस्टिक्स (पुरवठा) : वयोमर्यादा- किमान साडे एकोणीस वर्षे आणि कमाल- २५ वर्षे. अर्हता- प्रथम श्रेणीत बी.ए. इकॉनामिक्स किवा बी.कॉम. किंवा बी.एस्सी. (इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी किंवा सीए किंवा आयसीडब्ल्यूए किंवा मेकॅनिकल/ सिव्हिल/ मरिन/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल/ कॉम्प्युटर सायन्स/ इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी/ आíकटेक्चर या शाखेतील बीई किंवा बीटेक किंवा कोणत्याही शाखेतील पदवी आणि मटेरियल्स मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर पदविका.
निरीक्षण : वयोमर्यादा- किमान १९ वर्षे आणि कमाल
२३ वर्षे. अर्हता- ५५ टक्के गुणांसह कोणत्याही विषयातील पदवी. विद्यार्थिनींनी बारावीमध्ये भौतिकशास्त्र आणि गणिताचा अभ्यास केलेला असावा.
शिक्षण : वयोमर्यादा- किमान २१ वर्षे आणि कमाल २५ वर्षे. अर्हता- ५० टक्के गुणांसह एम.एस्सी. (भौतिकशास्त्र किंवा गणित किंवा कॉम्प्युटर अॅप्लिकेशन). विद्यार्थिनींनी भौतिकशास्त्र किंवा गणित या विषयांसह बी.एस्सी. परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा ६० टक्के गुणांसह मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल/ कॉम्प्युटर सायन्स/ इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी या शाखेतील बी.ई किंवा बी.टेक. पदवी
प्राप्त असावी.
विधि : वयोमर्यादा- किमान २२ वर्षे आणि कमाल २७ वर्षे. अर्हता- ५५ टक्के गुणांसह विधि शाखेतील पदवी आणि वकील म्हणून काम करण्याची पात्रता प्राप्त करणे आवश्यक.
एटीसी (एअर ट्रॅफिक कंट्रोल) : वयोमर्यादा- किमान साडेएकोणीस वर्षे आणि कमाल- २५ वर्षे. अर्हता- प्रथम श्रेणीसह भौतिकशास्त्र किंवा गणित किंवा इलेक्ट्रॉनिक्स या विषयातील बी.एस्सी. किंवा ५५ टक्के गुणांसह भौतिकशास्त्र किंवा गणित किंवा इलेक्ट्रॉनिक्स या विषयातील एम.एस्सी.
शॉर्ट सíव्हस कमिशन : नेव्हल आíकटेक्चर (शिल्पशास्त्र किंवा वास्तुकला)- वयोमर्यादा किमान २१ वर्षे आणि कमाल २५ वर्षे. अर्हता- ६० टक्के गुणांसह नेव्हल आíकटेक्चर/ मेकॅनिकल/ सिव्हिल/ एरोनॉटिकल/ मेटॅलर्जकिल/ एरोस्पेस या शाखेतील बीई किंवा बीटेक.
विद्यापीठ प्रवेश योजना (युनिव्हर्सटिी एन्ट्री स्कीम)- नेव्हल आíकटेक्चर (शिल्पशास्त्र किंवा वास्तुकला)- वयोमर्यादा- किमान १९ वर्षे आणि कमाल- २४ वर्षे. अर्हता- ६० टक्के गुणांसह नेव्हल आíकटेक्चर/ मेकॅनिकल/ सिव्हिल/ एरोनॉटिकल/ मेटॅलर्जकिल/ एरोस्पेस या शाखेतील बीई
किंवा बीटेक.
संपर्क- जेडीएम (ओआय अॅण्ड आर) खोली क्र. २०५, सी िवग, सेना भवन, नवी दिल्ली- ११००११.
ईमेल- officer-navy@nic.in, user-navy.nic.in
वेबसाइट- http://www.nausena-bharti.nic.in
स्कूल फॉर गर्ल्स, कित्तूर
ब्रिटिश सत्तेविरुद्ध यशस्वी लढा देत १८२४ साली कित्तूर येथे विजय संपादन करणाऱ्या आणि १८५७च्या भारतीय स्वातंत्र्य संग्रामातही महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कित्तूरच्या राणी चान्नाम्मा यांच्या शौर्याच्या आणि कर्तृत्वाच्या सन्मानार्थ कित्तूर येथे मुलींची निवासी सनिक शाळा सुरू करण्यात आली आहे.
ही शाळा सनिकी शाळांच्या धर्तीवर चालवली जाते. मुलींचा चौफेर व्यक्तिमत्त्व विकास आणि सक्षमीकरण या उद्दिष्टाने ही शाळा सुरू करण्यात आली आहे. मुलींमध्ये शौर्य, धर्य, साहस आणि कोणत्याही संकटांचा समर्थपणे सामना करण्याची शक्ती निर्माण व्हावी या अनुषंगाने अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे.
कित्तूर राणी चान्नाम्मा निवासी सनिक शाळा (मुलींची) येथील प्रवेशासाठी अखिल भारतीय चाळणी परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा बंगळुरू, गुलबर्गा, कित्तुर, बिजापूर, दावणगेरे आणि शिमोगा येथे घेण्यात येते. या परीक्षेचे माध्यम इंग्रजी आहे.
या संस्थेत अभ्यासक्रम इंग्रजीतून शिकवला जातो. बारावीनंतर मुलींना अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विविध चाळणी परीक्षा देता येणे सुलभ व्हावे यासाठी या संस्थेमध्ये विज्ञान शाखेचाच अभ्यासक्रम उपलब्ध आहे. यामध्ये इंग्रजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र/ कॉम्प्युटर सायन्स या विषयांचा समावेश आहे. हा अभ्यासक्रम हा सीबीएसईचा आहे.
सर्व मुलींना विविध प्रकारचे खेळ आणि एनसीसी प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या देशस्तरीय चाळणी परीक्षांच्या तयारीसाठी विशेष लक्ष पुरवले जाते.
विद्यार्थिनींना लष्करी प्रशिक्षणाचे धडे देऊन त्यांच्या चौफेर व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रयत्न केले जातात. विद्यार्थिनींची बौद्धिक तसेच इतर क्षमता लक्षात घेऊन प्रयत्नांची दिशा निश्चित केली जाते.
येथील प्रवेशाकरता चाळणी परीक्षेला बसण्यासाठी केवळ एकच संधी दिली जाते. वयोमर्यादा- १ जून रोजी १० वष्रे पूर्ण झालेल्या आणि १२ वर्षांखालील मुलीच या चाळणी परीक्षेला बसू शकतात. चाळणी परीक्षेनंतर सहावीला प्रवेश दिला जातो. त्यामुळे विद्यार्थिनींनी अधिकृत शाळेतून पाचवीची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
परीक्षेचा पेपर इंग्रजीमध्ये असतो. एकूण २०० गुणांसाठी तीन विषयांवर प्रश्न विचारले जातात. यात सामान्य अंकगणित- एकूण गुण ५०, भाषिक क्षमता- एकूण गुण ७५ (इंग्रजी- २५ आणि िहदी- २५ गुण) आणि मानसिक क्षमता चाचणी- एकूण गुण ७५ यांचा समावेश असतो. पेपरचा कालावधी- दोन तास. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी इंग्रजीत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. शारीरिक अर्हता- १) वय वष्रे १०-११ उंची- १२८ सेमी. वजन- २५ किलोग्रॅम २) वय वष्रे ११-१२ उंची-१३० सेमी. वजन- २८ किलोग्रॅम. लेखी चाळणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींनाच शारीरिक क्षमता चाळणी, वैद्यकीय तपासणी आणि मुलाखतीसाठी बोलावले जाते. मुलाखतीसाठी ५० गुण आहेत. अंतिम गुणवत्ता यादीत या ५० गुणांचा समावेश केला जातो. शारीरिक क्षमता चाचणीमध्ये १ किलोमीटर धावणे, उंच आणि लांब उडीचा समावेश आहे. ही क्षमता चाचणी प्रत्येक विद्यार्थिनीस उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
कित्तूर राणी चान्नाम्मा निवासी सनिक शाळा (मुलींची)च्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी वैद्यकीय चाचणी जिल्हा शल्य चिकित्सक आणि शाळा वैद्यकीय मंडळामार्फत (स्कूल मेडिकल बोर्ड) केली जाते. निवड मंडळामार्फत मुलाखत घेतली जाते. या परीक्षेचा अर्ज संस्थेच्या ६६६. www. kittursainikschool.org या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतो.
या संस्थेतील विद्यार्थिनींसाठी इयत्ता आठवी ते दहावी दरम्यान आयआयटी फाऊंडेशन अभ्यासक्रमाची सुविधा उपलब्ध आहे. JEE-MAIN आणि ऑल इंडिया प्री-मेडिकल टेस्ट- AIMPT तयारी करून दिली जाते. सर्व विद्यार्थिनींना एनसीसी प्रशिक्षण अत्यावश्यक आहे.
पत्ता- स्कूल फॉर गर्ल्स, कित्तूर, बेळगावी- ५९१११५.
ईमेल- info@kittursainikshool.org