मोईन खान प्रकरणाचा सखोल तपास करणार असल्याचे पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष शाहरियार खान यांनी स्पष्ट केल़े  वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यापूर्वी मोईन मध्यरात्री कॅसिनोमध्ये गेले होते व या वर्तवणुकीनंतर त्यांना मायदेशी परतण्याचे आदेश पीसीबीकडून देण्यात आले होत़े  याबाबत शाहरियार म्हणाल़े, ‘‘आपण कॅसिनोत रात्रीच्या भोजनासाठी गेलो होतो, असा खुलासा मोईनने दिला असला, तरी त्याचा सखोल तपास आम्ही करणार आहोत़’’
मोईनच्या घराबाहेर सुरक्षाव्यवस्था
सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेले पाकिस्तान क्रिकेट संघाचे निवड समिती प्रमुख मोईन खान यांच्या घराभोवती संतापलेल्या क्रिकेट चाहत्यांनी केलेल्या निदर्शनानंतर त्यांना सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे.

Story img Loader