फारुक नाईकवाडे

अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा सामान्य अध्ययन घटकामधील इतिहास, राज्यव्यवस्था आणि अर्थव्यवस्था या घटकांच्या तयारीबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

kalyan Dombivli municipal corporation
डोंबिवलीतील कोपरमध्ये स्थगिती आदेश देऊनही बेकायदा बांधकामाची उभारणी सुरूच; शासन, कडोंमपाचे आदेश बांधकामधारकांकडून दुर्लक्षित
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Foreign Minister S Jaishankar expressed confidence that he expects progress in relations with China
चीनबरोबरच्या संबंधांमध्ये प्रगतीची अपेक्षा; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याकडून विश्वास व्यक्त
Loksatta sanvidhanbhan Powers of inquiry and suggestions to the Commission for Scheduled Castes and Tribes under Article 338
संविधानभान: मारुती कांबळेचं काय झालं?
Decisions that protect the interests of consumers
ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणारे निकाल
Discrepancy in teaching hours in RTE and State Syllabus
आरटीई, राज्य अभ्यासक्रम आराखड्यातील अध्यापन तासांमध्ये विसंगती… झाले काय, होणार काय?
thane, navi mumbai, dombivali, kalyan gramin,
ठाणे-कल्याणच्या वेशीवर आगरी अस्मिता प्रभावी
ayushman bharat yojana
अन्वयार्थ : हा अट्टहास कशासाठी?

भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास (१८५७ ते १९९०)

*      इतिहासाचा अभ्यास करताना राजकीय व सामाजिकदृष्टय़ा महत्त्वाच्या घटनांचा क्रम लक्षात ठेवावा लागतो. त्यासाठी घटनांमधील परस्पर संबंध, कारणे, परिणाम असे आयाम समजून घेतल्यास घटना व त्यांचा क्रम दोन्ही व्यवस्थित समजतात व लक्षात राहतात.

*      १८५७च्या उठावापासून स्वातंत्र्य लढय़ापर्यंतचा पारंपरिक इतिहास आणि स्वातंत्र्योत्तर भारतातील १९९०पर्यंतच्या कालावधीतील महत्त्वाच्या घटना अशा दोन टप्प्यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

*      १८५७च्या उठावाचे विविध पैलू, त्यानंतर ब्रिटिशांची राजकीय वाटचाल व आर्थिक धोरणे, काँग्रेसची स्थापना व तीन कालखंड, स्वातंत्र्यासाठीचे गांधी कालखंडातील महत्त्वाचे तीन लढे/चळवळी, महत्त्वाचे नेते, स्वातंत्र्याच्या योजना इत्यादी बाबी अभ्यासायला हव्यात.

*      स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये घटना समिती, संस्थानांचे विलीनीकरण, पहिल्या दोन पंचवार्षिक योजना, भाषावार प्रांतरचना, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, भारताचे परराष्ट्र धोरण, चीन व पाकिस्तानबरोबरची युद्धे, बांगलादेश मुक्ती, भारताचे आण्विक धोरण, १९९०चे आर्थिक संकट इत्यादी मुद्दे पाहायला हवेत.

*      भारतातील विशेषत: महाराष्ट्रातील समाजसुधारक हा भाग जास्त लक्ष देऊन अभ्यासावा. यामध्ये समाजसुधारकाचे कार्य, संस्था, पुस्तके, वचने, काही महत्त्वाची वैयक्तिक माहिती जसे मूळ नाव, गाव, परदेश प्रवास, प्रभाव, गुरू, शिष्य, समकालीनांशी संबंध इत्यादींचा आढावा घ्यावा.

भारतीय अर्थव्यवस्था

*      मागील वर्षांच्या सामान्य अध्ययनाच्या एकूण २० प्रश्नांपैकी या घटकावर दरवर्षी साधारणपणे पाच ते सहा प्रश्न विचारलेले दिसतात. त्यामुळे या घटकाच्या तयारीस जास्त वेळ व महत्त्व द्यायला हवे.

*      तयारीची सुरुवात राष्ट्रीय उत्पन्न, चलन, बँकिंग, शासकीय अर्थव्यवस्था, आयात निर्यात, लेखा व लेखा परीक्षण, महागाई, दारिद्रय,  रोजगार यांचेशी संबंधित मूलभूत संकल्पना व्यवस्थित समजून घेऊन करायला हवी. या मुद्यांबाबतची महत्त्वाची आकडेवारी अद्ययावत करून घ्यावी व चालू घडामोडी माहीत असायला हव्यात. घटकनिहाय तयारीसाठी पुढील बाबी लक्षात घ्याव्यात:

१. भारतीय आयात—निर्यात

भारताच्या परकीय व्यापारातील सर्वाधिक मूल्य असणारे भागीदार देश किंवा गट, मागील तीन  वर्षांतील सर्वाधिक मूल्यांची निर्यात होणाऱ्या वस्तू किंवा सेवा, मागील तीन  वर्षांतील सर्वाधिक मूल्यांची आयात होणाऱ्या वस्तू किंवा सेवा, ठरावीक क्षेत्रांचा आणि एकूण आयात निर्यातीचा जीडीपीमधील वाटा याबाबतची आकडेवारी माहीत असायला हवी. आयात निर्यातविषयक नवी धोरणे, चर्चेतील मुद्दे माहीत करून घ्यावेत. परकीय गुंतवणुकीबाबत गुंतवणूक सर्वाधिक आकर्षित करणारी राज्ये आणि उद्योग, सर्वाधिक गुंतवणूक करणारे देश/ गट आर्थिक पाहणी अहवालातून पाहून घ्यावेत.

२. राष्ट्रीय विकासात सरकारी, सहकारी, ग्रामीण बँकांची भूमिका

चलन आणि बँकिं ग नियमनातील  रिझव्‍‌र्ह बँके ची भूमिका व कार्ये, बँकांचे प्रकार व त्यानुसार बदलणारी त्यांची कार्यक्षेत्रे व कार्ये, बँकांची अग्रक्रम क्षेत्रे, बेसल नियम या बाबींची तयारी उदाहरणे समोर ठेवून केली तर आत्मविश्वास वाढतो.

३. शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण

अर्थसंकल्पाच्या मूलभूत बाबींवर अद्यापि प्रश्न विचारलेले दिसत नसले तरी त्याबाबतच्या घटनात्मक तरतुदी, त्यातील उत्पन्नाचे स्रोत व खर्चाच्या बाबी, उत्पन्न व तूट याबाबतच्या संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे.

केंद्र व राज्याचा अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी अहवाल प्रकाशित झाल्यावर त्यातील जीडीपी व त्यातील महत्त्वाच्या क्षेत्रांचा वाटा,

कर आणि करेतर महसुलाचा वाटा व त्यातील मागील वर्षांच्या तुलनेत झालेली वाढ/घट, आयात निर्यातविषयक आकडेवारी, महत्त्वाच्या योजना, नवे प्रस्ताव अशा बाबींची टिपणे काढावीत.

४. पंचवार्षिक योजना

पंचवार्षिक योजनांचे प्रतिमान, ध्येयवाक्य, उद्दिष्ट, केंद्रस्थानी असलेले आर्थिक क्षेत्र, जीडीपीमध्ये झालेली वाढ, योजना काळातील महत्त्वाच्या योजना, प्रकल्प, महत्त्वाची राजकीय माहिती यांची टिपणे काढावीत.

५. किमती वाढण्याची कारणे व उपाय

या उपघटकाबाबत बहुधा बहुविधानी प्रश्न विचारलेले दिसतात. विशेषत: किंमत निर्देशांक, महागाई निर्देशांकांवर हे प्रश्न आधारलेले

आहेत. त्यामुळे किमती वाढण्याची कारणे, महागाई मोजण्यासाठीचे निर्देशांक, त्यावरील उपाय म्हणून राबवण्यात येणाऱ्या शासकीय योजना व त्या त्या वर्षीचे निर्णय असे मुद्दे अभ्यासावे लागतील.

भारतीय राज्यव्यवस्था

* या घटकावर एक मूलभूत आणि एक चालू घडामोडीवर आधारीत असे जास्तीत जास्त दोन प्रश्न विचारलेले दिसतात. एकूण २० पैकी दोनच प्रश्नांना वाव असल्याने या घटकावर कशा प्रकारे आणि कोणत्या मुद्यावर प्रश्न विचारला जाईल याचा अंदाज बांधणे अवघड आहे. तरी वरील मूलभूत मुद्दे तयार करणे आणि चालू घडामोडींवर लक्ष ठेवणे यापुरती तयारी मर्यादित ठेवायला हरकत नाही.

* राज्यघटनेचा अभ्यास हा भारतीय राज्यव्यवस्था घटकाच्या तयारीचा पाया आहे. अर्थात राज्यघटनेची सर्व कलमे तोंडपाठ करायची आवश्यकता नाही.

* घटनेतील मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये, राज्यांची नीतीनिर्देशक तत्त्वे, केंद्र-राज्य संबंध, घटनात्मक पदे, घटनादुरुस्ती याबाबतची कलमे व तरतुदी नेमकेपणाने समजून घ्याव्यात आणि पाठच कराव्यात.

* चालू घडामोडींच्या अनुषंगाने त्याबाबतची कलमे त्या त्या परीक्षेच्या अभ्यासामध्ये विशेष महत्त्व देऊन अभ्यासणे आवश्यक आहे.

* न्यायालयीन उतरंड, पंचायती राज व्यवस्था, महिला, मुले, अपंग, मागासवर्ग, अल्पसंख्याक या सामाजिक घटकांसाठीच्या तरतुदी यांबाबतच्या कलमांची नीट टिपणे काढली आणि त्यांची उजळणी केली तर पुरेसे ठरते. मात्र यापैकी कोणता मुद्दा चर्चेत असेल तर त्याबाबत जास्त सखोल अभ्यास करायला हवा.

* चर्चेत असलेले तसेच प्रस्तावित कायदे, नियम, धोरणे यांचाही अभ्यास आवश्यक आहे.

* सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्णय माहीत असावेत.