आयपीएलच्या अकराव्या हंगामात चेन्नईच्या संघासमोर अडचणी कमी होण्याची चिन्हं दिसतं नाहीयेत. केदार जाधव आणि सुरेश रैना दुखापतीमुळे संघाबाहेर गेल्यानंतर संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या यष्टीरक्षणावर प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यात खेळताना धोनीला पाठीचा त्रास जाणवायला लागला. मात्र अशाही परिस्थितीत धोनीने धडाकेबाज खेळी केली. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राजस्थानविरुद्धच्या सामन्यात धोनीला यष्टीरक्षणाची संधी देण्याची जोखीम संघ व्यवस्थापन घ्यायला तयार नाहीये.

अवश्य वाचा – चेन्नईच्या चाहत्यांची ‘टूरटूर’, पुण्यातला सामना पाहण्यासाठी संघाकडून व्हिजलपोडू एक्स्प्रेसची सोय

राजस्थानविरुद्धच्या सामन्यात धोनीला जागा मिळाल्यास, धोनी केवळ एक फलंदाज म्हणून संघात खेळेल. काही काळासाठी यष्टीरक्षणाची जबाबदारी दुसऱ्या खेळाडूवर सोपवली जाण्याची शक्यता आहे. बुधवारी झालेल्या सरावसत्रातही धोनीने सहभाग घेतला नसल्यामुळे, राजस्थानविरुद्धच्या सामन्यात धोनी खेळेल की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. धोनीच्या अनुपस्थितीत एन. जगदीशन किंबा अंबाती रायडूला संघात यष्टीरक्षणाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजस्थानविरुद्धच्या सामन्यात धोनी संघात खेळतो की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Story img Loader