उत्तर भारतात आयआयटी, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘लक्ष्य’ प्रशिक्षण संस्थेत या क्षेत्रातील एमटी एज्युकेअर लिमिटेडने ५१ टक्के भांडवली हिस्सा मिळविल्याची घोषणा केली आहे. ‘लक्ष्य फोरम फॉर कॉम्पीटिशन प्रा. लि.’ या कंपनीबरोबर त्या दृष्टीने सामंजस्याचा करार केला गेला आहे. प्रामुख्याने वाणिज्य पदवी अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना शिकवणी देणाऱ्या एमटी एज्युकेअरने ‘महेश टय़ुटोरियल्स’ या नाममुद्रेखाली देशा-विदेशात शाखांचे जाळे फैलावले आहे. आगामी काळात लक्ष्यकडून ठोस व्यावसायिक कामगिरीचे लक्ष्य एमटी एज्युकेअरने निश्चित केले आहे. ते साध्य झाल्यास ३० जून २०१८ पर्यंत या कंपनीवर १०० टक्के ताबा मिळविण्याचा आपला मानस असल्याचे एमटी एज्युकेअरचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश शेट्टी यांनी सांगितले.
एमटी एज्युकेअरकडून ‘लक्ष्य’चा ५१% हिस्सा काबीज
उत्तर भारतात आयआयटी, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘लक्ष्य’ प्रशिक्षण संस्थेत या क्षेत्रातील एमटी एज्युकेअर लिमिटेडने ५१ टक्के भांडवली हिस्सा मिळविल्याची घोषणा केली आहे.
First published on: 28-11-2012 at 09:57 IST
Web Title: Mt education acquired 51 share of lakshya