पुण्यातल्या कात्रज उद्यानात प्राणी संग्रहालयात वाघ बागिराम वाघीण रिद्धी यांच्या चार बछड्यांचं नामकरण करण्यात आलं. गुरू, आकाश, पौर्णिमा आणि सार्थक अशी या चार बछड्यांची नावं ठेवण्यात आली आहेत. बागिराम आणि रिद्धी यांना चार महिन्यांपूर्वी चार गोंडस पिल्लं झाली. त्यातले तीन नर तर एक मादी आहे. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या उपस्थितीत या गोंडस बछड्यांचं नामकरण करण्यात आलं. आत्ता ही पिल्लं पुणेकरांना पहाता येणार आहेत. याआधी 2004 मध्ये कात्रज उद्यानात वाघाचा जन्म झाला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहा व्हिडिओ

 

आज एकीकडे पुण्यातली कोंढवा भागात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. या बिबट्याच्या हल्ल्यात काहीजण जखमीही झाले. तर दुसरीकडे कात्रज उद्यानात मात्र वाघाच्या बछड्यांचा नामकरण सोहळा रंगला होता. या सोहळ्याला पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांचीही उपस्थिती होती.

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naming ceremony of four cubs in katraj zoo pune