पुणे: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) डिसेंबर-जानेवारीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत २४ नोव्हेंबर आहे.

हेही वाचा >>> पुणे: टीईटी गैरप्रकारातील शिक्षकांना दिवाळीपूर्वी वेतन; उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे प्राथमिक शिक्षण संचालकांचे निर्देश

हेही वाचा >>> पुणे: शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा

सीबीएसईने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. सीटीईटी ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाते. परीक्षेची तारीख उमेदवारांच्या प्रवेशपत्रावर नमूद केलेली असेल. परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम, भाषा, पात्रतेचे निकष, परीक्षा शुल्क, परीक्षा केंद्रे, महत्त्वाच्या तारखा आदी तपशील https://ctet.nic.in या संकेतस्थळावर देण्यात आला आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करून शुल्क भरलेल्या उमेदवारांना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वानुसार त्यांच्या पसंतीचे परीक्षा केंद्र उपलब्धतेनुसार दिले जाईल. त्यासाठी संबंधित  शहरातील परीक्षा केंद्रांची क्षमता विचारात घेतली जाईल. परीक्षा केंद्र असलेली शहरे, परीक्षार्थी क्षमता संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवार अर्ज भरत असताना,  शुल्क भरत असताना, शुल्क भरल्याची प्रक्रिया पूर्ण होताना एखाद्या शहरातील क्षमता पूर्ण झाल्यास संबंधित उमेदवाराला अन्य शहरातील परीक्षा केंद्र निवडण्याचा किंवा संबंधित व्यवहार रद्द करण्याचा पर्याय दिला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Story img Loader