पुणे: नोबेल पुरस्काप्राप्त शास्त्रज्ञ सर रिचर्ड जे. रॉबर्ट्स २ आणि ३ नोव्हेंबरला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला भेट देणार आहेत. २ नोव्हेंबरला विद्यापीठात होणाऱ्या व्याख्यानात ते आपल्या संशोधनाची वाटचाल उलडणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे: अकोले येथे किसान सभेचे राज्य अधिवेशन सुरू; ओला दुष्काळप्रश्नी तीव्र आंदोलनाचे नियोजन करणार

हेही वाचा >>> महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला गेल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यात आंदोलन

रॉबर्ट्स यांना १९९३मध्ये सेंद्रिय रसायनशास्त्र या विषयातील संशोधनासाठी नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. भारत दौऱ्यावर असलेले रॉबर्ट्स पुणे दौऱ्यात सिरम इन्स्टिट्युट, पर्सिस्टंट अशा विविध औद्योगिक संस्थाना भेटी देणार आहेत. तसेच राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) आणि राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र (एनसीसीएस) येथील संशोधकांना ते माार्गदर्शन करतील. मॉडर्न व फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशीही ते संवाद साधणार आहेत. २ नोव्हेंबरला दुपारी पावणेबारा वाजता एनसीसीएसमध्ये होणाऱ्या व्याख्यानात द पाथ टू नोबेल प्राइज या विषयावर ते संवाद साधणार आहेत. https://webcast.unipune.ac.in या संकेतस्थळावर या व्याख्यानाचे थेट प्रक्षेपण पाहता येईल, अशी माहिती विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अविनाश कुंभार यांनी दिली.

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nobel award winner sir richard j roberts lecture at the university on 2 november pune print news ysh