बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या  ‘भारत’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून त्याविषयी अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यामुळे भारतविषयी प्रत्येकाची उत्सुकता कमालीची वाढली आहे. त्यातच चर्चा होत आहे ती अभिनेत्री नोरा फतेहीची. नोराला पहिल्यांदाच बिग बजेट चित्रपटात झळकण्याची संधी मिळाल्यामुळे नुकतंच तिने याविषयी तिचं मत व्यक्त केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘दिलबर’ या गाण्यामुळे प्रकाशझोतात आलेल्या नोराला ‘भारत’मध्ये झळकण्याची संधी मिळाल्यामुळे ती प्रचंड उत्साही असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी मी योग्य असल्याचं सलमानने म्हटलं आहे असं ती म्हणाली.

‘या चित्रपटासाठी सलमान आणि अली अब्बास जफर यांनी माझी निवड केली असून चित्रपटात माझ्या वाट्याला आलेल्या भूमिकेला मी योग्य न्याय देऊ शकते असं सलमान आणि अलीला वाटत. या भूमिकेसाठी मी योग्य आहे असं त्यांनी स्वत: मला सांगितलं’, असं नोरा म्हणाली.

दरम्यान, ‘भारत’मध्ये नोरा करत असलेल्या भूमिकेबद्दल तिने फार काही सांगितलं नसलं तरी या चित्रपटामध्ये ती स्पॅनिश बोलताना दिसून येणार आहे. या चित्रपटामध्ये सलमान खान व्यतिरिक्त कतरिना कैफ, तब्बू, दिशा पटानू आणि सुनील ग्रोवर अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.

 

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nora fatehi i am grateful salman khan ali zafar who thought i was perfect for the character