काँग्रेस पक्षात प्रियांका गांधी यांच्यावर अधिक जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याच्या बातम्या येत असताना काँग्रेस पक्षाने आपली भूमिका जाहीर केली. गांधी घराण्यातील तीनही व्यक्ती म्हणजे सोनिया गांधी, राहुल आणि प्रियांका यांनी पक्षात आघाडीवर राहून नेतृत्व करावे, अशी पक्षाची अपेक्षा आहे, असे पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले.
सोनिया गांधी या काँग्रेस अध्यक्षा, तर राहुल उपाध्यक्ष आहेत. प्रियांका गांधी यांच्याकडे उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे सरचिटणीसपद सोपविण्यात येणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. याबाबत काँग्रेस पक्षाला काय वाटते असे विचारले असता, पक्षाला गांधी घराण्यातील तिघांनीही नेतत्व करावे असे वाटत असल्याचे पक्षाच्या प्रवक्त्या शोभा ओझा यांनी सांगितले. अलाहाबाद येथे प्रियांका या राजकारणात सक्रिय होत असल्याची माहिती देणारे पोस्टर झळकले आहेत, तर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते ऑस्कर फर्नाडीस यांनी बुधवारीच प्रियांका यांना पक्षाने महत्त्वाची भूमिका देणे गरजेचे असल्याचे म्हटले होते.
गांधी घराण्यातील ‘तिघां’नीही नेतृत्व करावे – काँग्रेस
काँग्रेस पक्षात प्रियांका गांधी यांच्यावर अधिक जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याच्या बातम्या येत असताना काँग्रेस पक्षाने आपली भूमिका जाहीर केली.
First published on: 08-08-2014 at 12:33 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Party wants all three gandhi family members to take leadership role congress