मीन : मानसिकता जपा

अमावास्या षष्ठस्थानातून होत आहे. हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नका. धीर धरून कोणतीही कृती करा. नकारार्थी विचार बाजूला ठेवा. मंगळ कन्या राशीत सप्तमस्थानात व शुक्र तूळ राशीत अष्टमस्थानात ५ सप्टेंबर रोजी प्रवेश करेल. गणेश चतुर्थी दिवशी शुभ गोष्टींचा संकल्प करायला विसरू नका. वातावरण प्रसन्न कसे राहील याकडे लक्ष द्या. नोकरदार वर्गाने कामकाजाचा व्याप सांभाळताना ताण येऊ देऊ नका. व्यावसायिकदृष्ट्या सध्या भागीदारी न केलेली चांगली. फायदा असो वा तोटा स्वतंत्र व्यवसाय करणे उत्तम राहील. रोखीच्या व्यवहारांना महत्त्व द्या. राजकारणापासून अलिप्त राहिलेले चांगले. कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्तींची काळजी घेताना स्वत:चीही मानसिकता जपा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

शुभ दिनांक : ८, ९

महिलांसाठी : भावनिक गोष्टींच्या आहारी  नको.

स्मिता अतुल गायकवाड

Story img Loader