पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशला भली मोठी भेट देण्याच्या तयारीत आहेत. मोदी हे तब्बल ४७३७ कोटी खर्चून उत्तर प्रदेशमध्ये ७५ प्रकल्प उभे करण्यासाठी आज (५ ऑक्टोबर) लखनऊमध्ये दाखल झाले आहेत. मोदींच्या उपस्थितीत देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ‘न्यू अर्बन इंडिया’ थीम अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आणि शहरी विकास विभाग तसेच उत्तर प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान मोदींसह राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या नेत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

राजनाथ सिंह सोमवारीच (४ ऑक्टोबर) लखनऊला आले होते. लखनऊ हा राजनाथसिंह यांचा संसदीय मतदारसंघ आहे. माहितीनुसार, या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत आग्रा, अलीगढ, बरेली, झाशी, कानपूर, लखनऊ, प्रयागराज, सहारनपूर, मुरादाबाद आणि अयोध्या येथे इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर, इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम आणि शहरी पायाभूत सुविधा तसेच अमृत ​​मिशन अंतर्गत राज्यातील विविध शहरांमध्ये उत्तर प्रदेश जल निगमद्वारे बांधलेल्या पिण्याचे पाणी आणि सीवरेज व्यवस्थेसाठी एकूण ४ हजार ७३७ कोटी रुपयांच्या ७५ विकास प्रकल्पांचं लोकार्पण/पायाभरणी करण्यात येणार आहे.

“मोदीजी, तुम्ही लखीमपूर खेरीला जाल ना?”; लखनऊ दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधानांना सवाल

पंतप्रधान मोदी यावेळी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या ७५ हजार लाभार्थ्यांना किल्ली सुपूर्द करून त्यांच्याशी संवादही साधतील. याशिवाय, मोदी लखनऊ, कानपूर, गोरखपूर, झाशी, प्रयागराज, गाझियाबाद आणि वाराणसी जिल्ह्यांसाठी ७५ स्मार्ट इलेक्ट्रिक बसेसचही उदघाटन करतील.

“मोदीजी लखीमपूर खेरीला जाणार आहात ना?”


लखनऊ दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधानांना काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी बोचरा सवाल केला आहे.
“मोजीदी स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यासाठी येत आहेत. आपल्याला स्वातंत्र्य कोणी मिळवून दिलं? शेतकऱ्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. लखनऊमध्ये हा कार्यक्रम घेण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुमच्या मंत्र्याला पदावरुन दूर करत त्याला मुलाला अटक का करत नाही ? हा नेता पदावर कायम राहिला तर सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाहीय,” अशा शब्दांमध्ये प्रियंका यांनी आपला संताप व्यक्त केला. त्याचसोबत, “मोदीजी तुम्ही लखीमपूर खेरीला जाणार आहात ना?”, असा प्रश्नही प्रियंका यांनी केला आहे,

Story img Loader