भारत सरकारने करदात्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. सरकारने देशामधील करदात्यांसाठी अधिकार पत्र म्हणजेच चार्टर ऑफ राइट्स (Charter of Rights) लागू करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये करदात्यांच्या सर्व अधिकारांबरोबर त्यांच्या दायित्वासंदर्भातील सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणरा आहे. याचबरोबर चार्टर ऑफ राइट्सनुसार आयकर विभागालाही वेळेत कर भरणाऱ्यांना वेळेवर सर्व सुविधा देणं बंधनकारक असणारा आहे. प्रामाणिकपणे कर देणाऱ्यांसाठी सरकारने ही सुविधा सुरु केली आहे. आयकर आणि त्यासंदर्भातील प्रक्रिया अधिक सोप्या करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे. पारदर्शकता वाढवण्यासाठीही केंद्रीय स्तरावर व्यवस्था निर्माण करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in