साहित्य

पुदिन्याची ३-४ पाने, साखरेचे सिरप १ चमचा, २ लिंबाच्या फोडी, डाळिंबाचा रस १२० मिलि, २०० मिलि सोडा.

कृती

बरणीसारखा एक ग्लास घ्या. त्यात लिंबू, पुदिना व साखरेचे सिरप घालून ते छान खलून घ्या. त्यात बर्फ भरा आणि वर डाळिंबाचा रस ओता. उरलेल्या ग्लासमध्ये सोडा घालून ढवळा.